भारत-पाक सामन्यावर सट्टा लावणारे 11 अटकेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

कळमेश्‍वर : क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींसह अकरा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अटक केली. कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा शिवारातील एका फार्महाउसमध्ये या बुकींनी अड्डा केला होता. लिंगा एका फार्महाउसमध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा व जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. गुन्हे शाखा व कळमेश्‍वर पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला. यावेळी क्रिकेट सट्टा लावणारे दोन बुकी नितीन प्रभाकर कुर्रेवार (वय 25, रा.

कळमेश्‍वर : क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींसह अकरा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अटक केली. कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा शिवारातील एका फार्महाउसमध्ये या बुकींनी अड्डा केला होता. लिंगा एका फार्महाउसमध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा व जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. गुन्हे शाखा व कळमेश्‍वर पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला. यावेळी क्रिकेट सट्टा लावणारे दोन बुकी नितीन प्रभाकर कुर्रेवार (वय 25, रा. भोला गणेश चौक, महाल, नागपूर) व प्रवीण गोपीचंद लुटे (वय 34, रा. महल, तुळशीबाग रोड, नागपूर) यांच्यासह दिनकर नारायण माटे, राजेश मिश्रीलाल वर्मा, दिवाकर कृष्णाजी लोंदे, संजय रामभरोसे भतवा, अब्दुल सलीम अब्दुल सलाम, अमीन जमील खान, गोपी भोलासिंग वर्मा, नरेंद्र कनिराम गौर, अभय विजय जाधव (सर्व रा. नागपूर) यांना अटक केली. त्यांच्याजवळून रोख 1 लाख 3 हजार 700 रुपये रोख, 15 मोबाईल, दोन चारचाकी वाहने, एक एलसीडी टीव्ही, डिश कनेक्‍शन छत्रीसह, सेट टॉप बॉक्‍स, ताशपत्ते व इतर शिल्लक साहित्य असा एकूण किंमत 14 लाख 13 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींवर कळमेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय पुरंदरे, पोलिस उपनिरीक्षक अनिल राऊत, लक्ष्मीप्रसाद दुबे, जय शर्मा, सुनील मिश्रा, दुर्गाप्रसाद पारडे, निलेश बर्वे, प्रणयसिंग बनाफर, वीरेंद्र नरड, अमोल कुथे यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 Arests in betting in India-Pakistan match