अकराशे शेतकऱ्यांची एका महिन्यात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

अकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपामुळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत लोटला जात आहे. त्यातूनच नोव्हेंबरमध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह वर्धा जिल्हा मिळून एकूण १०२२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. 

दुष्काळ, नापिकी, यामुळे कर्जांचा डोंगर वाढत आहे. रोजचा प्रपंच चालविणे कठीण; तेथे मुला-मुलींचे विवाह, शिक्षण आदींसाठी पैसा कोठून येणार? या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. सरकारने केलेली कर्जमाफी कागदावरच आहे. अनेकांना त्याचा लाभ मिळाला नाही. अतिवृष्टीची तुटपुंजी मदत जाहीर झाली, तीही अद्याप मिळालेली नाही. त्यातून दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. शासन स्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागातील पाच जिल्हे व वर्धा जिल्हा असे एकूण सहा जिल्ह्यांत नोव्हेंबर २०१८ पर्यंत १५ हजार ७२३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची नोंद आहे. यामध्ये सात हजार ५७ प्रकरणे पात्र, आठ हजार ४७० अपात्र, तर १९६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

आत्महत्येचा वाढता आलेख
शेतकरी आत्महत्यांचा आलेख दरवर्षी वाढताच आहे. २००१ मध्ये ५२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळे होते. ती संख्या आता हजारोंच्या घरात पोचली आहे. २०१६ मध्ये १२३५ तर गेल्या वर्षी ११७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यंदा जानेवारीत ९८, फेब्रुवारी ८४, मार्च ९६, एप्रिल ७८, मे ८४ , जून ८६, जुलै ८९ , ऑगष्ट १०६, सप्टेंबर १०४ , ऑक्‍टोबर १०३  व नोव्हेंबर महिन्यात ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Web Title: 1100 Farmer Suicide in One Month