११५ कृत्रिम तलावांत होणार विसर्जन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

नागपूर - शहरात उद्यापासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून महापालिकेचीही विसर्जनासाठी लगबग वाढली आहे. अनेक झोनने जुने कृत्रिम तलाव निकालात निघाल्याने  नव्यांची नोंद आरोग्य विभागाकडे केली असून काहींनी विसर्जनाची स्थळे वाढविण्याचीही मागणी केली. सर्वाधिक कृत्रिम तलाव धंतोली झोनमध्ये राहणार असून आशीनगर झोनमध्ये केवळ तीन ठिकाणी विसर्जनाची सोय राहणार आहे. 

उद्यापासून शहरातील घराघरांमध्ये गणेशमूर्तींची स्थापना केली जाईल. शहरात जवळपास दोन लाखांवर गणेशमूर्तींची स्थापना होते. यातील अनेक नागरिक घरीच ड्रम, विहीर, बादलीत गणेश विसर्जन करतात. परंतु, मोठ्या प्रमाणात नागरिक उत्साहाने गणेशमूर्ती विसर्जनासाठी वाजतगाजत विसर्जनस्थळी पोहोचतात. गेल्या काही वर्षात तलावातील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने कृत्रिम तलावाचा उपाय शोधून काढला. नागरिकांनी या तलावात विसर्जन करून महापालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेल्या वर्षी १ लाख ६४ गणेशमूर्तींचे या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. 

यंदाही महापालिकेचा आरोग्य विभाग विसर्जनासाठी दहाही झोनमध्ये  नागरिकांसाठी कृत्रिम तलाव, खड्ड्यांचे तसेच तात्पुरते सिमेंट तलाव उपलब्ध करून देणार आहे. लक्ष्मीनगर झोनने जुने सहा कृत्रिम तलाव नादुरुस्त असल्याने तेवढ्याच नव्या कृत्रिम तलावाची मागणी नोंदविली. धरमपेठ झोनमधील ९ जुने कृत्रिम तलाव नादुरुस्त असून तेवढ्याच टॅंकची  गरज व्यक्त केली आहे. हनुमाननगर नादुरुस्त चार कृत्रिम तलावाऐवजी तेवढीच नोंद केली. याशिवाय आणखी एका नव्या टॅंकची गरज नोंदविली. लकडगंज झोनने जुन्या दोन नादुरुस्त  कृत्रिम टॅंकसाठी नवीन मागितले तर एका नव्या तलावाची गरज व्यक्त केली. आशीनगरमध्ये तीनपैकी एक टॅंक नादुरुस्त आहे. मंगळवारीमध्ये ८ पैकी चार नादुरुस्त असून तेवढ्याच टॅंकची गरज नोंदविण्यात आली.

Web Title: 115 will be immersed in artificial ponds