नागपूर जिल्ह्यात ११५१ उपजत मृत्यू

Death-Registration
Death-Registration

नागपूर - जन्म होताच पहिले मिनिट बाळाच्या आयुष्यासाठी निर्णायक असते. ग्रामीण व दुर्गम भागात आजही स्त्रियांची प्रसूती घरी होते. यामुळे असुरक्षित बाळंतपणाची जोखीम वाढते. मेडिकल हब म्हणून विकसित होत असलेल्या नागपूर नावाच्या स्मार्ट सिटीतील महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीत ७००, तर नागपूर ग्रामीण भागात ३५१ असे १०५१ उपजत मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली. गडचिरोलीपेक्षा जास्त उपजत मृत्यू नागपूर शहरात झाले, हे विशेष.

स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास येणाऱ्या उपराजधानीत लवकरच मेट्रो धावणार आहे. मात्र, उपजत मृत्यूचा आकडा विदर्भामध्ये नागपुरात सर्वाधिक आहे. टर्शरी केअर युनिट म्हणून विदर्भातून सुरक्षित बाळंतपणासाठी महिला नागपूरच्या मेडिकलमध्ये येतात. मात्र, मेडिकलमध्ये १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या वर्षभरात ३३७ उपजत मृत्यू झाले असल्याची नोंद आहे. नागपूर एकीकडे मेडिकल हब बनत आहे. 

मात्र, उपजत मृत्यूचा टक्का कमी होण्याऐवजी वाढतच आहे, ही बाब उपराजधानीसाठी असमाधानकारक आहे. ग्रामीण भागात घरी प्रसूती होण्याचे प्रमाण १० टक्के आहे. घरी प्रसूत होणाऱ्या स्त्रियांना बाळंतपणादरम्यान आशांची मदत मिळते. गर्भवती असताना प्रसूतीपूर्व सेवा मिळतात.

प्रवास ठरतो कारणीभूत 
नागपूरचे भांडेवाडी शहर असो की घोगली नजीकचे वेळाहरी गाव. भांडेवाडी, यशोधरानगरपासून महापालिकेचे हेल्थपोस्ट कोसो दूर अंतरावर आहेत. प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर अनेकदा हेल्थपोस्टपर्यंत पोहोचू शकत नाही. दरम्यान, प्रसूती घरीच होते. अशा वेळी वैद्यकीय उपचारांअभावी बाळ दगावण्याची भीती असते. हीच स्थिती वेळाहरी गाव असो की शंकरपूर. येथे प्राथमिक आरोग्य केंद्रच नसल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे या गावात गर्भवती महिला असल्यास त्यांना उपचारासाठी रात्रीअपरात्री कठीण समस्यांचा सामना करावा लागतो. गर्भवती असताना जोखीम वाढल्यामुळे गर्भातच बालके दगावण्याचे प्रमाण कायम आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com