बारावी फेरपरीक्षेत विभागाचा निकाल 25 टक्के

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

नागपूर  : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे जुलैत घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. 24) घोषित करण्यात आला. यामधे विभागातून 25.51 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतील सर्वाधिक 38.36 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विभागात 11 हजार 94 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांची परीक्षा 17 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान घेण्यात आली. त्यात 11 हजार 84 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 2 हजार 828 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यामध्ये 1 हजार 751 मुले तर 1 हजार 77 मुलींचा समावेश होता. निकालात विज्ञान शाखेतील सर्वाधिक 829 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. वाणिज्य शाखेत 318, कला शाखेत 1 हजार 415 तर एमसीव्हीसीमधे 203 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. फेरपरीक्षेत विभागाने राज्यातून चौथा क्रमांक पटकाविला आहे.
विभागनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
कला - 21.83 टक्के
वाणिज्य - 26.33 टक्के
विज्ञान - 38.36 टक्के
एमसीव्हीसी - 20.44 टक्के

Web Title: 12 result news