डझनभर रेल्वेगाड्या रद्द

File photo
File photo


नागपूर : मुंबईतील अतिवृष्टीमुळे सुरू झालेला रेल्वेगाड्या रद्द करण्याचा क्रम अद्यापही सुरूच आहे. मंगळवारी नागपुरात येणाऱ्या किंवा मार्गे धावणाऱ्या डझनभर रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. यात प्रामुख्याने मुंबई दुरांतो व सेवाग्राम एक्‍स्प्रेसचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांना गैरसायींचा सामना करावा लागत आहे.
रेल्वेगाड्या अडकून पडल्याने रॅकच उपलब्ध नसल्याने परतीच्या मार्गातील गाड्यांवरही परिणाम झाला आहे. मंगळवारी 12289 मुंबई-नागपूर दुरांतो, 2139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्‍स्प्रेस, 11201 लोकमान्य टिळक टर्मिनस-अजनी एक्‍सप्रेस, 11046 धनबाद-कोल्हापूर दीक्षाभूमी एक्‍स्प्रेस, 12262 हावडा-मुंबई दुरांतो, 12880 भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस, 17609 पटना-पूर्णा एक्‍स्प्रेस, 22848 लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम सुपरफास्ट एक्‍स्प्रेस, 22866 पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस, 12146 पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस, 12101 लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा एक्‍स्प्रेस आणि 19317 इंदौर-पुरी हमसफर एक्‍स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. या शिवाय बुधवारी धावणाऱ्या 19318 पुरी-इंदौर हमसफर एक्‍स्प्रेस व 12879 लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर एक्‍स्प्रेस, गुरुवारी धावणारी 22865 लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी एक्‍स्प्रेसही रद्द केली आहे.
.....
नागपुरात प्रवाशांच्या मदतीसाठी बूथ
रेल्वेगाड्या रद्द होत असल्याने रेल्वे तिकीट रद्द करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्यासुद्धा मोठी आहे. ही बाब लक्षात घेता रद्द केलेल्या तिकिटांचा परतावा मिळण्यासाठी नागपूर व वर्धा स्थानकावर विशेष बूथ सुरू केले आहे. धावणाऱ्या रेल्वेगाड्या, रद्द झालेल्या किंवा मार्ग बदललेल्या रेल्वेगाड्यांची योग्य माहिती प्रवाशांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नागपूर स्थानकावर प्रवासी मदत बूथ सुरू केले आहे. वाणिज्य विभागाचे अधिकारी व निरीक्षकांकरवी प्रवाशांना गाड्यांबाबत माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. याशिवाय उद्‌घोषणा प्रणालीवरून गाड्यांबाबतची माहिती सतत दिली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com