राज्यभरात 1245 टॅंकर 

चेतन देशमुख
सोमवार, 21 मे 2018

यवतमाळ - वाढत्या तापमानासोबत नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. सध्या राज्यभरात 1 हजार 245 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात सर्वाधिक 709 टॅंकर औरंगाबाद विभागात असून, अमरावती विभागात तब्बल 213 टॅंकर नागरिकांची तहान भागवीत आहेत. 

यंदा अत्यल्प पावसामुळे विदर्भात डिसेंबर 2017 पासूनच पाणीटंचाईची झळ बसणे सुरू झाले. तशीच स्थिती मराठवाड्यातील औरंगाबाद विभागातही होती. सततचा दुष्काळ, खोलवर जाणारा भूजलसाठा, त्यामुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईशी नागरिकांना दोन हात करावे लागत आहे. सध्या राज्यभरातील 1 हजार 185 गावे तसेच 777 वस्त्यांना 1 हजार 245 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अमरावती विभागात सर्वाधिक टॅंकर यवतमाळ जिल्ह्यात सुरू आहेत. बुलडाणा व अकोला जिल्ह्यातील स्थिती सारखीच आहे. वाशीम जिल्ह्यात 25 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील नऊ गावांना आठ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यवतमाळ शहरातील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. शहरात सर्वांत जास्त टॅंकर सुरू आहेत. 

नागपूर विभागात 37 टॅंकर 
नागपूर विभागात दिलासादायक चित्र असून, 33 गावांना 37 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात नागपूर जिल्ह्यातील 28, तर वर्धा जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश आहे. 

विभाग--------टॅंकर संख्या 
औरंगाबाद------709 
पुणे-----------490 
अमरावती-------213 
नाशिक----------179 
ठाणे-------------85 

Web Title: 1245 water tankers in state