श्रेयसी शाह विदर्भात अव्वल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) गुरुवारी दुपारी बारावीचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये विज्ञान शाखेतून जैन इंटरनॅशनल स्कूल येथील श्रेयसी शाह या विद्यार्थिनीने 98.4 टक्के गुणांसह विदर्भातून अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) गुरुवारी दुपारी बारावीचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये विज्ञान शाखेतून जैन इंटरनॅशनल स्कूल येथील श्रेयसी शाह या विद्यार्थिनीने 98.4 टक्के गुणांसह विदर्भातून अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
वाणिज्य शाखेतून भारतीय विद्या भवन्सच्या सिव्हिल लाइन्स शाखेतील तन्मय चिंडालिया आणि निधी पुनियानी या दोघांनी 97.4 टक्के गुणांसह शहरातून संयुक्तपणे दुसरा तर वाणिज्य शाखेत पहिला क्रमांक पटकाविला आहे. याच शाळेतील रजत वर्मा (वाणिज्य) आणि भवन्स श्रीकृष्णनगर येथील इशा रेड्डी (मानव्यशास्त्र) या दोघांनी 97.2 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागतो. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, आज सर्वच विद्यार्थ्यांना आश्‍चर्याचा धक्का देत, तब्बल 24 दिवस आधी निकाल लावण्याचा विक्रम केला. निकालात शहरातील सीबीएसई शाळांनी चांगली कामगिरी केली. वाणिज्य शाखेत भवन्स सिव्हिल लाइन येथील रजत वर्मा याने 97.2 टक्के गुण घेत दुसरे तर रशिता वर्मा हिने 97 टक्‍क्‍यांसह तिसरे स्थान मिळविले. विज्ञान शाखेत जैन इंटरनॅशनलच्या सार्थक आडे याने 97.4 टक्‍क्‍यांसह दुसरे भवन्स श्रीकृष्णनगर येथील कशा सिंग आणि केंद्रीय विद्यालय वायुसेनानगर येथील सत्यप्रकाश कारशर्ना यांनी 97 टक्के गुणांसह संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकाविला आहे. भवन्स श्रीकृष्णनगर येथील अनुष्का झंवर आणि केंद्रीय विद्यालय वायुसेनानगर येथील प्रबल गुप्ता यांनी 96.6 टक्के गुणांसह विज्ञान शाखेतून चौथे स्थान प्राप्त केले आहे. मानव्यशास्त्र शाखेत केंद्रीय विद्यालय वायुसेनानगर येथील सचिन पटेल आणि सेंटर पॉइंट स्कूल काटोल रोड येथील लुभाना डोंगरे यांनी 97 टक्के गुणांसह दुसरे तर सेंटर पॉइंट स्कूल येथील आल्हाद राऊत याने 96.6 टक्‍क्‍यांसह तिसरे स्थान मिळविले. जैन इंटरनॅशनल, भारतीय विद्या भवनच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील निकालात चांगली कामगिरी केली.

अशी आहेत टॉपरची नावे
विज्ञान शाखा
श्रेयसी शाह - जैन इंटरनॅशनल स्कूल - 98.4 टक्के
कशा सिंह - भवन्स श्रीकृष्णनगर - 97 टक्के
सत्यप्रकाश शर्ना - केंद्रीय विद्यालय वायुसेनानगर- 97 टक्के
अनुष्का झंवर - भवन्स, श्रीकृष्णनगर- 96.6 टक्के
प्रबल गुप्ता - केंद्रीय विद्यालय वायुसेनानगर- 96.6 टक्के
वाणिज्य शाखा
तन्मय चिंडालिया - भवन्स, सिव्हिल लाइन - 97.4 टक्के
निधी पुनियानी - भवन्स, सिव्हिल लाइन- 97.4 टक्के
रजत वर्मा - भवन्स, सिव्हिल लाइन - 97.2 टक्के
रशिता वर्मा - भवन्स, सिव्हिल लाइन - 97 टक्के
मानव्यशास्त्र शाखा
इशा रेड्डी - भवन्स, श्रीकृष्णनगर - 97.2 टक्के
सचिन पटेल - केंद्रीय विद्यालय वायुसेनानगर - 97 टक्के
लुभाना डोंगरे - सेंटर पॉइंट स्कूल, काटोल रोड - 97 टक्के
आल्हाद राऊत - सेंटर पॉइंट स्कूल, काटोल रोड - 96.6 टक्के

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12th CBSE result news