नागपूरामध्ये बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या 

अनिल कांबळे
बुधवार, 16 मे 2018

नागपूर : बारावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली. भारती अलकराम वर्मा (17, रा. शांतीनगर, इसासनी) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. 

भारती ही शंकरनगर परिसरातील एलएडी महाविद्यालयात शिकत होती. तिने नुकताच बारावीत वर्गात प्रवेश घेतला होता. सध्या महाविद्यालयाला सुट्‌या असून शिकवणी वर्ग सुरू होते. तिचे आईवडील हातमजुरीचे काम करतात. मंगळवारी तिचे आईवडील कामावर गेले होते. तर भारती शिकवणी वर्गाला गेली होती.

शिकवणी वर्गावरून ती दुपारी 2 वाजता परतली. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता तिची आई कामावरून परतली असता दरवाजा आतमधून बंद होता. तिच्या आईने खिडकीतून डोकावले असता तिने छताच्या लोखंडी हुकला दुपट्टयाच्या सहाय्याने गळफास घेतला होता. आईने कसाबसा दरवाजा उघडून मुलीला लता मंगेशकर वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. मृत्यूपूर्वी भारतीने कोणत्याही स्वरुपाची चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. एमआयडीसीचे हवालदार जिवलग घाटे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. भारतीच्या आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, कौटूंबिक वाद आत्महत्येचे कारण असल्याची चर्चा आहे. 

Web Title: 12th girl s suicide in nagpur