अश्लिल नृत्य केल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा

अश्लिल नृत्य केल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा

कळमेश्वर (नागपूर) : नागपूर-अमरावती महामार्ग क्र. 6 वरील गौंडखैरी येथे अश्‍लिल नृत्य करणाऱ्या 13 मुला-मुलींना शनिवारी मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये एक महिलेसह 7 मुलींचा समावेश आहे.

शनिवारी मध्यरात्रीनंतर सुमारे पाऊनेदोन वाजता कळमेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोंडखैरी (बरड) येथे पोलिस हवालदार प्रकाश उईके यांना येथे मुले-मली डीजेच्या आवाजावर नृत्य करीत असल्याची माहिती मिळाली. यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांचे मार्गदर्शनात छापा टाकल्यावर मुले-मुली अश्लिल नृत्य करीत असल्याचे दिसून आले. त्याच्या जवळून नृत्याचे साहित्य व 12 मुला-मुलींसह 1 महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये ललित उदयसिंग, अजिब गुलाब खान, राहुल शैलेंद्र दहाटे, प्रदीप देवदास गणवीर, नितेश गोविंदराव माहूरे यांच्यासह 7 मुली व एका महिलेचा समावेश आहे. कळमेश्वर पोलिसांनी सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, कळमेश्वरचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे व सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी पार पाडली. 

अर्धा तास आधी चौघांना अटक

अश्लिल नृत्य टाकण्यापूर्वी याच परिसरात पोलिसांनी कारवाई करीत चार आरोपींना हुक्‍का व सुगंधित तंबाखूसह अटक केली होती. गौंडखैरी बरड यथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी यापूर्वी केला आहे. दोन महिन्यापूर्वी पैशाच्या वादातून एका युवकाचा खून गौंडखैरी बरड येथील अल्पवयीन आरोपींनी केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com