वाहन उलटून 13 जवान जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानावरून परतताना पोलिसांचे भू-सुरुंगरोधक वाहन उलटले. या अपघातात 13 जवान जखमी झाले. ही घटना चामोर्शी मार्गावरील येवली गावाजवळ मंगळवारी (ता. सात) रात्री घडली. जखमी चार जवानांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

जिल्हा पोलिस मुख्यालयातील नक्षलविरोधी अभियान पथकाचे जवान मंगळवारी रात्री भू-सुरुंगरोधक वाहनाने चामोर्शीकडे जात होते. अचानक वाहनासमोर म्हशींचा कळप आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून वाहन उलटले. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी जखमी जवानांना जिल्हा रुग्णालयात भरती केले. सर्व जवानांची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

Web Title: 13 soilders injured in accident