13 आरोपींना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

नागपूर - शहरात दोन दिवसांत झालेल्या सहा खुनाच्या घटनांमध्ये पोलिसांनी आतापर्यंत 13 आरोपींना अटक केली.

पाचपावलीतील रवी सातपैसे या युवकाच्या हत्याकांडात एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये श्‍याम कुसरे, इंदर बेलपारधी, महेंद्र भनारकर, प्रवीण लांजेवार, अक्षय माहुरे, महेश आसोले आणि तिनेश माहुरे यांचा समावेश आहे. अन्य आरोपींना अटक करण्यासाठी दोन पथके रवाना झाली आहेत.

हुडकेश्‍वरातील पंकज ऊर्फ गोलू मुन्नाप्रसाद तिवारी या युवकाच्या हत्याकांडात हुडकेश्‍वर पोलिसांनी धम्मानंद माणिकराव बोरकर आणि मन्साराम सुखलाल मेश्राम या दोघांना अटक केली. त्यांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हरीश बावणे (वाठोडा) या युवकाच्या हत्याकांडात नंदनवन पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. मोहम्मद असलम अन्सारी, सूरज गवळी, रोहन रंगारी, जितेंद्र पासवान, सुगत बागडे अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अंबाझरीतील पांढराबोडीत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या नीलेश ऊर्फ बग्गाबाबा कौरती याच्या हत्याकांडात अंबाझरी पोलिसांनी चौघांना अटक केली. यामध्ये प्रणव कावळे, राहुल खंडाते, मुकुंदा खंडाते आणि बबल्या सेंगरचा समावेश आहे.

पत्नीचा खून करणारा मोकाट
गुरुदेवसिंग मोहर (रा. जरीपटका) याने शनिवारी पत्नी लवप्रीत कौर हिचा गळा आवळून खून केला होता. लवप्रीतचा खून झाल्यानंतर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी पती गुरुदेवसिंग मोहरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला; मात्र तो अद्याप मोकाट आहे.

Web Title: 13 suspects arrested