राज्यातील शहरी गरिबांसाठी 13 हजार 506 घरे मंजूर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

अकोला - केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्रातील 15 शहरांतील गरिबांसाठी 13 हजार 506 घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण 1 लाख 50 हजार घरे मंजूर करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यातील अकोट शहराचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे येथील गरिबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार असून अकोट शहरात किती घरे बांधण्यात येतील, याची माहिती कळू शकली नाही.

केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या 34 व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील 15 शहरातील गरिबांसाठी 643 कोटींची गुंतवणूक आणि केंद्राच्या 201 कोटींच्या सहाय्यासह 13 हजार 506 घरे मंजूर करण्यात आली आहेत. या बैठकीत 7 हजार 227 कोटींची गुंतवणूक व 2 हजार 209 कोटींच्या अर्थ सहाय्यासह देशभरातील 10 राज्यांच्या 370 शहरांसाठी 1 लाख 50 हजार घरे मंजूर करण्यात आली आहेत. राज्यातील निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील एका तालुक्याचा समावेश करण्यात आला असला तरी पुणे जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील या शहरांचा समावेश -
राज्यातील पुणे जिल्ह्यातील पिंपरी वाघिरे, वाघोली आणि म्हाळुंगे तसेच शिरुर तालुक्यातील वाढु, हवेली तालुक्यातील वेळू व वडगाव. अकोला जिल्ह्यातील अकोट, चंद्रपूर शहर, नांदेड जिल्हयातील नांदेड वाघाळा, नाशिक जिल्हयातील मालेगाव, सातारा शहर, नाशिक शहर, सोलापूर शहर, अहमदनगर जिल्ह्यातील राहता, कर्जत आणि पाथर्डी तसेच उस्मानाबाद शहर या शहरांमध्ये वर्ष 2017-18 साठी एकूण 13 हजार 506 घरे मंजूर झाली आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: 13 thousand 506 houses approved for urban poor in the state