सात दिवसांत 13 हजार कोटींचे वाटप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

नागपूर - केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा बंद केल्यानंतर शहरातील एटीएम आणि बॅंकामध्ये पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गेल्या सात दिवसांत शहरात अंदाजे 13 हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम एटीएम व बॅंकांमधून ग्राहकांनी काढल्याची माहिती आहे. त्या तुलनेत नव्या नोटा येत नसल्याने ग्राहकांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे. 

नागपूर - केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा बंद केल्यानंतर शहरातील एटीएम आणि बॅंकामध्ये पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गेल्या सात दिवसांत शहरात अंदाजे 13 हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम एटीएम व बॅंकांमधून ग्राहकांनी काढल्याची माहिती आहे. त्या तुलनेत नव्या नोटा येत नसल्याने ग्राहकांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे. 

भारतीय रिझर्व्ह बॅंकेतून शहरातील एटीएम आणि बॅंकांमधून दररोज सरासरी 1500 ते 1800 कोटी रुपयांचे वाटप केले जात आहे. त्या सर्वच नोटांचे वाटपही झपाट्याने केले जात आहे. गेल्या आठ दिवसांत 500 व एक हजारच्या 11 हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम बॅंकांकडे जमा झालेली असल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या सूत्राने सांगितले. रिझर्व्ह बॅंक आणि राष्ट्रीयीकृत बॅंकेचे कर्मचारी दिवस-रात्र नोटा मोजणे आणि त्याचे नियोजन करण्यास व्यस्त आहेत. सोमवारी बॅंकेला सुटी होती तरी बॅंकांमधील कर्मचारी कामावर होते. गेल्या सात दिवसांपासून येथील कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत. मागणीनुसार बॅंकांना नोटा वाटप करण्यात येत असताना नोटा झपाट्याने बाजारातून गायब होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुन्या नोटा झपाट्याने बदलल्या जाव्यात असे नागरिकांना वाटत आहे. यामुळेच बॅंकेतील ग्राहकांची गर्दी कमी न होता वाढतच आहे. परिणामी, नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रिझर्व्ह बॅंक फक्त दोन हजारांच्या नोटाच बॅंकाना देत नाही तर 100, 50, 20 आणि दहा रुपयाच्या नोटांचेही वाटप केले जात आहे. तरीही बाजारातून नोटा संपण्याचे होण्याचे प्रमाण अधिक आहे. नागरिक आता 100 आणि 50 रुपयांच्या नोटांचा साठा करीत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली. 

15 दिवसांत येणार पाचशेची नोट 
नागपूरच्या रिझर्व्ह बॅंकेत 2000, 100, 50 रुपयांचा मोठा साठा आहे. बॅंकांना वाटपही करण्यात येत आहेत. 500 रुपयांच्या नवीन नोटा रिझर्व्ह बॅंकेत पोहोचलेल्या नाहीत. सरकार 500 रुपयांच्या नोटांची प्रिंटिंग झाल्याचे जाहीर करीत असताना अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. पुढील 15 दिवस येण्याची शक्‍यता नसल्याने अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे रिझर्व्ह बॅंकेतील सूत्रांनी सांगितले. 
 

Web Title: 13 thousand crore allocation for seven days