वीज ग्राहकांनी केला 13.21 कोटींचा भरणा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

नागपूर - महावितरणच्या जिल्हाभरातील वीज ग्राहकांनी गेल्या दोन दिवसांमध्ये एकूण 13.21 कोटींचा भरणा केला आहे.

नागपूर - महावितरणच्या जिल्हाभरातील वीज ग्राहकांनी गेल्या दोन दिवसांमध्ये एकूण 13.21 कोटींचा भरणा केला आहे.

पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटांद्वारे वीजदेयक भरण्याची मुभा वीज ग्राहकांना देण्यात आल्यानंतर महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रांवर बिल भरण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री 12 पर्यंत देयक स्वीकारण्यात आले. शुक्रवारी एकाच दिवशी महावितरणकडे एकूण 7 कोटी 5 लाख रुपये भरण्यात आले. महावितरणचे प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांनी सायंकाळी 7 वाजतानंतर वीजबिल भरणा केंद्रावर स्वत: जाऊन तिथल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासह कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला. शनिवारी सायंकाळी 7 पर्यंत बिल केंद्र सुरू राहिले. शनिवारी दिवसभरात कॉंग्रेसनगर आणि बुटीबोरी या शहर मंडळांतर्गत असलेल्या केंद्रांवर 1 कोटी 44 लाखांचा महसूल गोळा झाला. उर्वरित जिल्ह्यात 4 कोटी 72 लाख रुपये जमा झाले. शनिवारीही रेशमे यांनी सायंकाळी 5 पासून विविध केंद्रांवर जाऊन व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. ग्राहकांना अडचणी येणार नाही, या दृष्टीने त्यांनी कर्मचाऱ्यांना अवश्‍यक सूचना केल्या.

Web Title: 13.21 crore paid by electricity consumers