नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये 135 खाटांचे केंद्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नागपूर ः नागपुरातील आबाजी थत्ते सेवा संशोधन संस्थेच्या वतीने जामठा परिसरात "नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट' उभारण्यात आले. सातव्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून 135 खाटांच्या सुविधा केंद्राचे उद्‌घाटन वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या ऑन्कोलॉजी विभागप्रमुख डॉ. आशा कापडिया (मुंबई) उपस्थित होते. डॉ. मुखर्जी म्हणाले, या कॅन्सरग्रस्तांना या नवीन सुविधा केंद्राच्या माध्यमातून अद्ययावत सेवा उपलब्ध होतील. यामुळे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट अधिक सक्षम होईल.

नागपूर ः नागपुरातील आबाजी थत्ते सेवा संशोधन संस्थेच्या वतीने जामठा परिसरात "नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट' उभारण्यात आले. सातव्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून 135 खाटांच्या सुविधा केंद्राचे उद्‌घाटन वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या ऑन्कोलॉजी विभागप्रमुख डॉ. आशा कापडिया (मुंबई) उपस्थित होते. डॉ. मुखर्जी म्हणाले, या कॅन्सरग्रस्तांना या नवीन सुविधा केंद्राच्या माध्यमातून अद्ययावत सेवा उपलब्ध होतील. यामुळे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट अधिक सक्षम होईल. कॅन्सरवर अत्याधुनिक उपचारामुळे गुणवत्ता निश्‍चित वाढेल. डॉ. आशा कापडिया यांनी संस्थेतर्फे उपचारासह संशोधनावर भर द्यावा, असे सांगितले. संस्थेचे सचिव शैलेश जोगळेकर यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटसंदर्भातील माहिती दिली. सध्या या संस्थेत 225 खाटा असून कॅन्सरवरील उपचारात ही संस्था माइलस्टोन असल्याचे सांगितले. यावेळी वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक यांनी कॅन्सर संस्थेत उपचारासंदर्भात माहिती दिली. कॅन्सरग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, या खाटांच्या संख्येत पुन्हा वाढ होईल. येथील उपचार गरिबांच्या आवाक्‍यात असल्याचेही ते म्हणाले. यावेळी ऍड. सुनील मनोहर यांनी आपले विचार व्यक्त केले. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया उपस्थित होते. आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, एम्सच्या संचालक डॉ. विभा दत्ता, मिलिंद कुकडे, आनंद औरंगाबादकर उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 135 Cancer Centers at the National Cancer Institute