‘या’ तालुक्यातील अंगणवाड्यांमुळे शिरपेचात मानाचा तुरा...वाचा

images.jpg
images.jpg

पातूर (जि. अकोला) : तहसील कार्यालयाअंतर्गत चालणाऱ्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयातील एकूण 14 अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झालेले आहे. तर अजूनही 37 प्रस्तावित आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या गुणवत्तापूर्ण सुरू असणाऱ्या कामकाजामुळे हे यश गाठता आल्याने त्यांचे तालुक्यात कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांना मिळत आहेत अनेक सुविधा
बदलत्या शिक्षण प्रणालित कॉन्व्हेंट संस्कृतीला तोडीस-तोड देत स्मार्ट व डिजिटल शिक्षण देत विद्यार्थ्यांची गुणवत्ता बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकास साधण्याच्या दृष्टीने तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये विविध उपक्रम राबवून काम चालत आहे. आनंददायी वातावरण राहण्यात त्यादृष्टीने अंगणवाड्यांची रंगरंगोटी केली आहे तर विद्यार्थ्यांना आय कार्ड, बैठक व्यवस्था, प्रसाधनगृहे, वॉटर फिल्टर, प्रथम उपचार पेटी इत्यादी सुविधा पुरवल्या जातात. तालुक्यात एकूण 121 अंगणवाड्या तर 19 मिनी अंगणवाड्या आहेत शैक्षणिक सत्र 2019-20 मध्ये 14 अंगणवाड्यांची आयएसओ मानांकनासाठी प्रस्ताव पाठवले होते. त्या 14 ही अंगणवाड्यांना नामांकन मिळाले असून, अंगणवाडी विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यात पातूर तालुका अग्रेसर ठरला आहे.

अनेकांच्या कार्याला आले फळ

सत्र 21 मध्ये अजूनही 37 अंगणवाड्यांचे मानांकन प्रस्ताव प्रतीक्षेत आहेत. एकूण 35 निष्कर्ष तपासून कॉलिटी मॅनेजमेंट सिस्टीम 9001-2015/टी. एस. 16949 नुसार 14 अंगणवाड्यांना नामांकन दिले आहे. त्यासाठी मिळालेले रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. यासाठी एकात्मिक बालविकास अधिकारी समाधान राठोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे, पर्यवेक्षिका वैशाली हाडोळे, अरुणा बांगर यांचे मार्गदर्शन लाभले तर, 14 गावातील अंगणवाड्यांना मानांकन मिळवण्यासाठी ग्रामसेवक सरपंच व गावकऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. जिल्ह्यातून फक्त पातूर तालुक्यात 14 अंगणवाड्यांना मानांकन मिळाले हे विशेष.

कर्मचाऱ्यांचा गौरवच
शासनस्तरावरून सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत. उपलब्धतेनुसार अंगणवाडी सेविका, मदतनीस आपले कार्य अगदी उत्कृष्टरित्या करत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव यानिमित्ताने झाला आहे. भविष्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी सोडवण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय सदैव तयार आहे.
-समाधान जाधव, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास, पातूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com