पोलिस-नक्षल चकमक ; पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार

मनोहर बोरकर
रविवार, 22 एप्रिल 2018

या चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षली ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सर्वात मोठी कार्यवाही असण्याची शक्यता असून उच्चपदस्थ नक्षली साईनाथ ठार झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

एटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता. 22)  रोजी सकाळी अकराच्या सुमारास पोलिस-नक्षल चकमकीत पेरमिली दलम कमांडो तथा माओवादी चळवळीचा विभागीय सदस्य साईनाथसह 14 माओवाद्यांचा गडचिरोली पोलिसांचे C-60 कमांडोंनी खात्मा केला.

या चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षली ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सर्वात मोठी कार्यवाही असण्याची शक्यता असून उच्चपदस्थ नक्षली साईनाथ ठार झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. नक्षलविरोधी शोधमोहिम सुरू असताना ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पोलिस विभागाशी संपर्क साधला असता चकमक झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला. यामध्ये पेरमिली दलम कमांडो साईनाथसह चौदा नक्षली ठार झाले आहेत. गेली 35 ते 40 वर्षातील माओवादी चळवळी विरोधातील ही सर्वात मोठी कार्यवाई मानली जात आहे. यापूर्वी सन 2013 मध्ये अहेरी तालुक्यातील गोविंदगाव जंगल परिसरात सहा मावोवादी ठार करण्यात आले. 6 डिसेंबर 2017 रोजी सिरोंचा तालुक्यातील कल्लेड जंगल परिसरात 7 माओवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले होते. 

पेरमिली दलम कमांडो साईनाथ हा जहाल माओवाद्यांमध्ये गनला जात होता. त्याचा एटापल्ली, भामरागड व अहेरी अशा तीन तालुक्यातील नक्षली कार्यवायात सक्रीय सहभाग दिसून येत असे. गतवर्षी एका पोलिस नक्षल चकमकीत त्याची पत्नी पेरमिली दलम उपकमांडो संगिताचा पोलिसांनी खात्मा केला होता. आजच्या कार्यवाईत साईनाथ व त्याचे संपूर्ण दलमचा खात्मा झाल्याने नक्षल चळवळीला फार मोठा हादरा बसला आहे

Web Title: 14 Naxlite Have been Dead Permili Commando