सारईच्या जोडीची शिकार करणाऱ्या 14 जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

नवेगावबांध (जि. गोंदिया) : येथील राष्ट्रीय उद्यानात अवैधरित्या प्रवेश करून सारई या दुर्मीळ प्राण्याच्या जोडीची शिकार करणाऱ्या 14 जणांना वनविभागाने अटक केली आहे.

नवेगावबांध (जि. गोंदिया) : येथील राष्ट्रीय उद्यानात अवैधरित्या प्रवेश करून सारई या दुर्मीळ प्राण्याच्या जोडीची शिकार करणाऱ्या 14 जणांना वनविभागाने अटक केली आहे.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील रामपुरी बिट कक्ष क्रमांक 223 व 718 मध्ये येलोडी येथील शिकाऱ्यांनी सारई जोडीची 30 जूनला शिकार केल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता. 13) वनाधिकाऱ्यांनी मनोज मळकाम (रा. येलोडी) याला ताब्यात घेतले व चौकशी केली. चौकशीत त्याने टिकाराम मळकाम, महेंद्र भुमके, भूपेश भुमके, देवदास दुगे, प्रवीण कोडापे, नीतेश शहारे, विश्‍वनाथ इळपाते, जितेंद्र पुराम, जितेंद्र भुमके, कीर्तिदास गेडाम, भरत सलामे, संतोष मडावी, दिगांबर भुमके (सर्व रा. येलोडी) यांची नावे सांगितली. वनविभागाने या सगळ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यांनी शिकार केल्याचे कबूल केले. यावरून वनविभागाने गुन्हा दाखल करून अटक केली.

Web Title: 14 people arrested for hunting

टॅग्स