स्मशानभूमीतून होत आहे रेती वाहतूक

road
road

चिमूर : नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8 मधील शेडेगाव येथील स्मशानभूमी लगत असलेल्या घाटातील रेती उपसा करून. रेती वाहतुकीच्या नेहमीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने ट्रक व ट्रॅक्टर स्मशानभूमीतून वाहतुक सुरू आहे. दफन भूमीतून सततच्या वाहतुकीने परिसरातील नागरीकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याने त्यांनी रेती वाहतूक करणारी वाहने रोखून धरली.

निवासी घरे, संकुल आणि विकास कामात मोठ्या प्रमाणात रेतीचा उपयोग होत असल्याने रेती उपसा व वाहतुक व्यवसाय तेजीत आहे. रितसर शासकीय नियमानुसार लिलावाद्वारे रेती घाटाचे कंत्राट देण्यात येते. ही रेतीउपसा व वाहतूक करण्याकरीता मोठे ट्रक व ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाते ज्यामुळे पक्क्या रस्त्यांची अवस्थासुद्धा बिकट होत असून अशा घाट परीसरातील नागरीकांना वाहतूक व ये-जा करणे मोठ्या जिकीरीचे झालेले आहे. चिमूर नगर परिषद क्षेत्रातील शेडेगाव घाटाचे कंत्राट वरोरा येथील नाना चांभारे यांना मिळालेले आहे. त्यांच्या द्वारे रेतीचा उपसा सतत पाऊस असुनही सुरू आहे.

चिमूर नगर परीषदेकडून स्मशान भूमीकडे जाणाऱ्या मार्गाचे काँक्रीटीकरण झाले असून सततच्या ट्रक आणी ट्रॅक्टरच्या रेती वाहतूकीने या मजबुत रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. रेती वाहतुकीकरीता निर्धारीत केलेल्या मार्गावर पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल वाढल्याने रेती वाहतूक शक्य नसल्याने कुणालाही याची माहिती न देता स्मशान भूमीतून वाहतूक सुरू ठेवण्यात आली. स्मशानभूमीमध्ये अनेक प्रेतं पुरण्यात आलीत त्यावरून ही वाहने जाऊन दुर्दशा झाली. या विषयी कंत्राटदारास माहिती देण्यात आली. मात्र कंत्राटदाराकडून रेतीची वाहतूक स्मशानभूमीतुन मुजोरीने वाहतुक सुरूच ठेवण्यात आली.

शेडेगाव येथील रेती व्यवसायीका कडून मुजोरीने स्मशानभूमीतून वाहतूक केल्याने वृक्ष लागवडी अंतर्गत लावलेली झाडे, 500 मीटरपर्यंत झालेली रस्त्याची दुर्दशा यामुळे सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान झाले असून याची तक्रार उपविभागीय अधिकारी व पोलीस विभागाकडे नगर परिषदेकडून करण्यात येईल.
- गोपाल झाडे, नगराध्यक्ष, चिमूर नगर परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com