शहरातील ऑर्केस्ट्रा बार देहव्यापाराचा अड्डा!

File photo
File photo

शहरातील ऑर्केस्ट्रा बार देहव्यापाराचा अड्डा!
नागपूर : डान्सबारवर बंदी असली तरी ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अजूनही शहरात नंगानाच सुरू आहे. पोलिसांना "मॅनेज' केल्यानंतर बारमध्ये तरुणींना देहव्यापारासाठी उपलब्ध केले जात आहे. शहरातील काही बारमध्ये आंबटशौकीन ग्राहकांना हुक्‍का, ड्रग्ससह तरुणींची ऑफर बारमालक देत आहेत. एका रात्री लाखोंची उलाढाल होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर शहर पोलिसांच्या हद्दीत असलेल्या अनेक बारमध्ये ऑर्केस्ट्रासाठी तरुणींना गीत प्रस्तुतीसाठी परवानगी दिली आहे. मात्र, बारमध्ये जवळपास 20 ते 25 तरुणी किचनमधील कामाच्या नावाखाली बोलविण्यात येतात. बारमध्ये आलेल्या आंबटशौकिनांना बारमालक हेरून स्टेजवर तरुणींना बोलवितो. रात्री बारानंतर त्या तरुणी अर्धनग्न अवस्थेत नृत्यू करून ग्राहकांना आकर्षित करतात. येथूनच देहव्यापारासाठी सौदा होतो. नशेत असलेला ग्राहक तरुणींसाठी हजारो रुपये खर्च करण्यास तयार होतो.
एमआयडीसी, हिंगणा, कळमना, कोराडी, सीए रोड, नंदनवन, अजनी, हुडकेश्‍वर, बेलतरोडी, अंबाझरी, वाडी, जरीपटका आणि सीताबर्डी परिसरात असलेल्या काही बारमध्ये पोलिसांच्या आशीर्वादाने तरुणी देहव्यापार करतात. दर महिन्याला डीबीचे पथक बारमालकाची भेट घेऊन "अर्थपूर्ण' संबंध जोपासतात. एमआयडीसी परिसरातील चार ते पाच बारमधून फार्म हाउसवर तरुणींना देहव्यापारासाठी पुरविल्या जात असल्याची माहिती आहे.
तरुणींना कुटुंबाची साथ
बारमध्ये स्टेज डान्सर किंवा गायक म्हणून आलेल्या तरुणींच्या कुटुंबीयांना हकिकत माहिती असते. अनेकदा नातेवाईकच बारपर्यंत मुलींना सोडून देतात. अनेक तरुणी स्वतःहून देहव्यापार करतात. आर्थिक परिस्थितीमुळे किचनचे काम करण्यासाठी सुरुवातीला बारचे काम स्वीकारले. परंतु, बारमालकाने गैरफायदा घेत देहव्यापारात ओढले. पैशाचे आमिषापोटी यामध्ये मीसुद्धा ओढल्या गेले, अशी प्रतिक्रिया तरुणीने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
ब्यूटी पार्लर ते बार
हायफाय बारमध्ये डान्स करण्यासाठी ब्यूटी पार्लर हा एकमेव रस्ता आहे. ब्यूटी पार्लर, मसाज पार्लर, स्पा ऍण्ड लेडीज जिम येथे कामाचा अनुभव असणाऱ्या मुलींना बारमध्ये लवकर एंट्री मिळते. बारमध्ये सर्वाधिक पैसा असते. एका रात्री एक ते 15 हजार रुपये एक तरुणी कमावू शकते. ब्यूटी पार्लरमधील कमाई केवळ एक ते दोन हजार रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com