15 कोटींच्या झेरॉक्‍स मशीन बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामार्फत महाविद्यालयातील 145 परीक्षा केंद्रांना 15 कोटी रुपये खर्च करून पुरवठा केलेल्या झेरॉक्‍स मशीन सहा महिन्यांतच बंद पडल्या आहेत. त्या निकृष्ट असून, खरेदीत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप महाविद्यालयांमार्फत केला जात आहे. विशेष म्हणजे, या मशीन दोन वर्षांपूर्वीच वितरित केल्या होत्या.

नागपूर विद्यापीठाने परीक्षा पद्धतीचे संपूर्ण काम ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ऑनलाइन मूल्यांकनासह परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन प्रश्‍नपत्रिकांची डिलिव्हरी करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. विद्यापीठामध्ये दर वर्षी साडेचार लाख विद्यार्थी परीक्षा देतात. या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाते. मात्र, ऑनलाइन परीक्षेचा खर्च परवडणारा नसल्याने महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे यासाठी आवश्‍यक उपकरणांची मागणी केली. त्यानुसार विद्यापीठाने निविदा प्रक्रिया करून 174 पैकी 145 परीक्षा केंद्रांना झेरॉक्‍स मशीन देण्याचा निर्णय घेतला. या मशीनमधून ऑनलाइन प्रश्‍नपत्रिकांच्या झेरॉक्‍स काढून परीक्षा घेतली जाते. परंतु, 145 पैकी जवळपास सर्वच महाविद्यालयांमधील या झेरॉक्‍स मशीन सहा महिन्यांतच बंद पडल्यात. त्यामुळे महाविद्यालयांना स्वखर्चातून पुन्हा नव्याने झेरॉक्‍स मशीन खरेदी करण्याची वेळ आली. विद्यापीठाने दिलेल्या झेरॉक्‍स मशीन दुरुस्तीसाठीचा खर्चही परवडणारा नसल्याने त्या शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठांनी दिलेल्या या झेरॉक्‍स मशीनच्या खरेदीवर महाविद्यालयांकडून शंका उपस्थित केली जात आहे.

दर्जेदार मशीन अपेक्षित
परीक्षा केंद्रांसाठी एवढ्या मोठ्या संख्येने मशीन घेताना विद्यापीठाने दर्जेदार मशीन घेणे अपेक्षित होते. मात्र, 15 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे.

-

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 crore Xerox machine shut down