गुन्हा दाखल न करण्यासाठी १५ लाखांची लाच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

नागपूर - चोरीच्या गुन्ह्यात कायदेशीर कारवाई न करण्यासाठी १५ लाखांची लाच स्वीकारणारे पोलिस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, वकील दिवाकर राठोड व ॲटर्नी गणेश अमृतलाल जैस्वाल यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली. तसेच वकील व ॲटर्नीला अटक केली. लाचखोर पोलिस अधिकारी फरार आहे.

राठोड हा लकडगंज पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. तो मूळचा यवतमाळचा आहे. तक्रारदार प्रेमबाबा हे मूळचे यवतमाळ येथील रहिवासी असून, त्यांच्याविरोधात लकडगंज पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. प्रकरणाचा तपास राठोड यांच्याकडे आहे. कायदेशीर कारवाई न करण्यासाठी राठोड याने यवतमाळ येथील वकील हर्षल याच्या माध्यमातून तक्रारदाराकडून १५ लाखांची लाच मागितली. प्रेमबाबाने याची तक्रार एसीबीकडे दिली. राठोड याने लाच स्वीकारण्यास तयारी दर्शवत रक्कम हर्षल याच्याकडे देण्यास सांगितले. कारवाईत राठोड याने मागणी केलेली रक्कम हर्षल यांच्या सांगण्यावरून गणेशने स्वीकारली. तिन्ही आरोपींविरोधात सीताबर्डी पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला.

लकडगंज ठाण्यात खळबळ
पीएसआय उमाकांत राठोड हा एसीबीच्या तावडीत सापडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे पोलिस ठाण्यात चर्चेला ऊत आला. विशेषतः डीबीतील काहींनी सरळ ठाणे न गाठता तपासाचे नाव सांगून बाहेर पाय काढला. काहींनी कानोसा घेण्यासाठी पंटर ठाण्यात पाठवले. यामुळे गंगाजमुनातून मलाई कमविणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.

Web Title: 15 lakh bribe to the case