कृषी पुरस्कारांवर विदर्भातील 16 शेतकऱ्यांची मोहोर

कृषी पुरस्कारांवर विदर्भातील 16 शेतकऱ्यांची मोहोर

नागपूर : राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांची शनिवारी (ता. 2) घोषणा करण्यात आली. 2015 आणि 2016 सालच्या या पुरस्कारांमध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य कारणाऱ्या विदर्भातील 16 शेतकऱ्यांचा समावेश आहे. यासोबतच राज्यस्तरीय पीक स्पर्धेच्या विजेत्यांची नावेही कृषी विभागाने घोषित केली आहेत. 

वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार 2015 अरुण गणवतराव धुळे सुनगाव (ता. जळगाव जामोद, जि. बुलडाणा), सैयद खुर्शीद सै. हाशम बोरगाव मंजू (जि. अकोला) व यादव दसरूजी मेश्राम लवारी उमरी (ता. साकोली, जि. भंडारा) यांना जाहीर झाला. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) 2015 शशिकांत भाष्करराव पुंडकर येऊलखेड (ता. शेगाव, जि. बुलडाणा), दिलीप उर्फ रामदास नारायण फुके चांभई (ता. मंगरूळपीर, जि. वाशीम) व हेमंत वसंतराव देशमुख डोंगरकिन्ही (ता. मालेगाव, जि. वाशीम) यांना जाहीर झाला. उद्यान पंडित पुरस्कार 2015 भदू गणपत कायदे पहेला (जि. भंडारा) व अतुल पुरुषोत्तम लकडे अब्बासपुरा (ता. अचलपूर, जि. अमरावती) यांना जाहीर झाला. 

यासोबतच वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार 2016 नंदा काल्या चिमोटे पलश्‍या (ता. चिखलदरा, जि. अमरावती), अरविंद उद्धवराव बेंडे रातचांदणा (जि. यवतमाळ) व प्रवीण विश्‍वनाथराव बोबडे रासेगाव (ता. अचलपूर जि. अमरावती) यांना जाहीर झाला आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) 2016 अमृत तुळशीराम मदनकर खोलमारा (ता. लाखांदूर, जि. भंडारा) व राजेंद्र महादेवराव ताले दिग्रस (ता. पातूर, जि. अकोला) यांना जाहीर झाला. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) 2016 सुरेश बापुराव गरमडे वायगाव (ता. वरोरा, जि. चंद्रपूर) यांना तर उद्यान पंडित पुरस्कार 2016 अशोक शिवराम वानखेडे टाकळी सुकळी (ता. उमरखेड जि. यवतमाळ) व अशोक पंजाबराव धोटे कोच्छी (ता. सावनेर, जि. नागपूर) यांना जाहीर झाला आहे. पुणे येथे या पुरस्कारांचे समारंभपूर्वक वितरण होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com