मुंबईमार्गावरील 16 ट्रेन रद्द

file photo
file photo

नागपूर : मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली रेल्वेसेवा अद्यापही पूर्वपदावर येऊ शकली नाही. सोमवारी नागपूरमार्गे धावणाऱ्या 16 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. तर, सुमारे डझनभर रेल्वेगाड्या इतरत्र वळविण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
पाऊस ओसरताच मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झाली असली तरी रॅक उपलब्ध नसल्याने गाड्या रद्द करण्याचा क्रम सोमवारीसुद्धा सुरू राहिला. 22886 टाटानगर-एलटीटी अंत्योदय एक्‍स्प्रेस, 12262 हावडा- मुंबई एक्‍स्प्रेस, 11402 नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्‍स्प्रेस, 12869 मुंबई- हावडा एक्‍स्प्रेस, 11401 मुंबई- नागपूर नंदीग्राम एक्‍स्प्रेस, 12261 मुंबई- हावडा दुरांतो, 12105 मुंबई- गोंदिया विदर्भ एक्‍स्प्रेस, 12289 मुंबई-नागपूर दुरांतो, 12809 मुंबई-हावडा मेल, 12145 एलटीटी- पुरी एक्‍स्प्रेस, 18029 एलटीटी- शालीमार कुर्ला एक्‍स्प्रेस, 12102 हावडा- एलटीटी ज्ञानेश्‍वरी एक्‍स्प्रेस, 12810 हावडा-मुंबई मेल, 12859 हावडा- मुंबई गीतांजली एक्‍स्प्रेस, 12811 एलटीटी- हटीया सुपरफास्ट एक्‍स्प्रेस आणि 12880 भुवनेश्‍वर- एलटीटी एक्‍स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. या शिवाय मंगळवारी रवाना होणाऱ्या 12146 व 22866 पुरी - एलटीटी एक्‍स्प्रेस आणि 22848 एलटीटी - विशाखापट्टणम्‌ एक्‍स्प्रेस, बुधवारी रवाना होणारी 12879 एलटीटी- भुवनेश्‍वर एक्‍स्प्रेस, गुरुवारी रवाना होणारी 22865 एलटीटी- पुरी एक्‍स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेप्रवाशाने काही उपाययोजना केल्या असल्या तरी त्या पुरेशा नसल्याची ओरड प्रवाशांकडून होत आहे.
प्रवाशांना खाद्यपदार्थांचे वितरण
प्रवासी सुविधेच्या दृष्टीने प्रमुख रेल्वेस्थानकांवरून रद्द करण्यात आलेल्या व वळविलेल्या गाड्यांची माहिती दिली जात आहे नागपूर आणि वर्धा रेल्वेस्थानकावर प्रवाशांना तिकीट परतविण्यासाठी विशेष बूथ उघडण्यात आले आहे. शिवाय 12810 हावडा -मुंबई एक्‍स्प्रेस व 12152 हावडा- एलटीटी समरसता एक्‍स्प्रेसच्या प्रवाशांना नागपूर आणि वर्धा स्थानकावर पिण्याचे पाणी, चहा, बिस्कीट, केळे तसेच खाद्यपदार्थांचे नि:शुल्क वितरण करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com