आगीत १७ कोटींची मालमत्ता खाक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

वर्षभरात १,१२४ घटना - १ अब्ज ६० लाखांची मालमत्ता वाचविली

नागपूर - गेल्या वर्षभरात (१ एप्रिल ते ३१ मार्च) शहरात विविध ठिकाणी आगीच्या १ हजार १२४ घटना घडल्या. यात १७ कोटी ५ लाख १ हजार ३५० रुपयांची मालमत्ता खाक झाली. तर, १ अब्ज, ६० कोटी, ३७ लाख ७३ हजार ७५० रुपयांची मालमत्ता वाचविण्यात विभागाला यश आले. 

शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात असताना महापालिकेच्या अग्निशमन विभागाची धुरा केवळ २१८ कर्मचाऱ्यांवर आहे. विभागाकडे २१ फायर टेंड, २ वॉटर टॅंकर, १ हाड्रोलिक प्लॅटफॉर्म, १ फोम टेंडर, ३ इमरजन्सी टेंडर, ३ आरआयव्ही, ५ ॲम्ब्युलन्स, १ जीप, ७ यामाहा व वॉटर मिस्टमोटर सायकल, २ पीकअप व्हॅन, ४ समो आणि १ क्वॉलिस गाड्या आहेत.

अग्निशमन विभागाच्या ८७२ पदांचा आकृतिबंध शासनातर्फे मंजूर करण्यात आला. यात उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उपविभागीय अग्निशमन अधिकारी, सबऑफिसर ही नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. परंतु, पालिकेच्या आर्थिक डबघाईस आलेल्या स्थितीमुळे यातील अनेक पदे रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळातही विभागाने चांगली कामगिरी केली. वर्षभरात विभागाला ४२१ कॉल्स आले. 

एकूण झालेल्या घटांमध्ये ४ स्त्रिया व ५ पुरुष जिवंत तर २३ स्त्रिया व ६० पुरुषांना मृतावस्थेत काढण्यात आले. वर्षभरात २ हजार ९४४ दूषित विहिरींचा उपसा केला. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांनी शहराबाहेर आगीच्या एकूण ३० घटनांवर नियंत्रण मिळविले.

अग्निशमन दिवस आज
१४ एप्रिल १९४४ रोजी लंडनहून कराचीमार्गे मुंबईत दाखल झालेल्या ‘एस. फोर्ट स्टिकिंग’ या जहाजाचा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. ६६ जवानांना आगीशी झुंज देताना हौतात्म्य प्राप्त झाले होते. या दिवसाचे स्मरण म्हणून या दिवशी अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो.

Web Title: 17 crore property loss in fire