वैष्णवीच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा

वैष्णवीच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा

अमरावतीः वैष्णवी (रा. मलकापूर, जि. बुलडाणा) या 17 वर्षीय मुलीच्या अपहरणानंतर तिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी विदर्भ खाटीक समाजसेवा समितीतर्फे महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह विभागीय आयुक्तांकडे सोमवारी (ता. 20) निवेदनाद्वारे करण्यात आली.

वैष्णवी गुजर ही विद्यार्थिनी 13 जानेवारीला महाविद्यालयात जाते, असे सांगून घरून गेली. मात्र, ती घरी न परतल्याने पालकांनी मलकापूर ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध केवळ अपहरणाचा गुन्हा नोंदविला. 18 जानेवारीला तिचा मृतदेह मध्य प्रदेशच्या नेपानगर पोलिस ठाणे हद्दीत रेल्वेरुळाशेजारी संशयास्पदस्थितीत आढळला. तिला कोणी पळवून नेले, रेल्वेतून ढकलून तिचा खून करण्यात आला किंवा खून करून रेल्वे अपघाताचा देखावा निर्माण केला, इत्यादी प्रश्न या घटनेतून निर्माण झाले आहेत.

या घटनेचा निषेध करीत प्रथमदर्शनी खुनाचा व ऍट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवून प्रकरणाचा वरिष्ठांच्या देखरेखीत तपास करण्यात यावा, पीडितेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी महिला व बालकल्याणमंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे तसेच जिल्हाधिकाऱ्यांसाठी तहसीलदार गजेंद्र मालठाणे यांना समितीतर्फे निवेदन देण्यात आले.

समितीचे अध्यक्ष दीपक घन, उपाध्यक्ष पुरुषोत्तम विरूळकर, गोपाल हरणे, भीमराव माकोडे, सुरेश वानखडे, अशोक पारडे, देवराव कुऱ्हेकर, किशोर दुर्गे, सुनील दुर्गे, वासुदेव गायगोले, अमित गायगोले इत्यादींचा शिष्टमंडळात समावेश होता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com