17 वर्षीय मुलाचा  चिमुकलीवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नागपूर - घरी असलेल्या आठ वर्षांच्या मुलीवर घरमालकाच्या 17 वर्षीय मुलाने बलात्कार केला. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मुलाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

नागपूर - घरी असलेल्या आठ वर्षांच्या मुलीवर घरमालकाच्या 17 वर्षीय मुलाने बलात्कार केला. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मुलाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामाच्या शोधात नागपुरात आलेले दाम्पत्य वानाडोंगरीत भाड्याने राहतात. पती बारमध्ये वेटर, तर पत्नी मजुरीसाठी बाहेर जाते. घरी आठ वर्षांची मुलगी व सहा वर्षांचा मुलगा राहतो. घरमालकाच्या दहावीत शिकणारा मुलगा प्रताप याने (बदललेले नाव) 4 मे रोजी मुलीशी चाळे केले. तर, 18 मे रोजी दुपारी अंगणात खेळत असलेल्या मुलीला घरात नेऊन तिच्यावर बळजबरी केली. सायंकाळी कामावरून आई घरी आल्यानंतर मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे आईने तिला डॉक्‍टरांकडे नेले. डॉक्‍टरांनी रक्‍तस्राव झाल्याचे सांगून आईला कल्पना दिली. दवाखान्यातून एमआयडीसी ठाण्यात पोहोचल्या. महिला पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर मुलीने आपबिती सांगितली. 

मुलाने अत्याचार केल्याची कबुली दिली. त्याला न्यायालयाच्या आदेशाने सुधारगृहात पाठविण्यात येणार आहे. 
-भारत क्षीरसागर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एमआयडीसी

Web Title: 17-year-old son raped in minor girl