विषबाधा बळी प्रकरणी 1.70 कोटीची मदत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

अकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत पावलेल्या राज्यातील 63 शेतकरी व शेतकरी मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत सरकारने मंजूर केली अाहे. यापूर्वी आठ कुटुंबांना मदतीची रक्कम देण्यात आली असून, उर्वरित 55 कुटुंबियांसाठी 1.70 कोटी रुपयांच्या निधीची मंजूरी देण्यात आली आहे. मदतीची रक्कम तत्काळ संबधित कुटुंबांना वितरीत करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत. 

गतवर्षी खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकांवर कीटकनाशके फवारताना शेकडो शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होऊन, 63 शेतकरी व शेतकरी मजुरांचा बळी गेला. त्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश 22 फेब्रुवारी 2018 रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. मात्र त्यांचेपैकी यवतमाळ येथील मृत 12 शेतकरी व 9 शेतमजुरांपैकी केवळ आठ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनाच प्रत्येकी दोन लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून विमा कंपन्यांकडून देण्यात आली. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व मुत शेतकरी व शेतकरी मजुरांच्या कुटुंबियांना समान चार लाख रुपये मदत देणे अपेक्षीत होते. त्यानुसार 26 शेतकरी व 29 शेतमजूर अशा एकूण 55 मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तत्काळ देण्यासाठी 1.70 कोटी रुपये आकस्मिकता निधीतून वितरीत करण्यास 15 मे रोजी शासन मंजूरी देण्यात आली आहे. 

या निधीतून मिळेल मदतीची रक्कम 
मंजूर मदतीची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना व आकस्मिक निधीतून वितरीत करण्यात येणार असून, त्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. 

सर्वाधिक बळी यवतमाळ, अकोला दुसऱ्या क्रमांकावर 
कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याने, सर्वाधिक बळी 21 बळी यवतमाळ जिल्ह्यात गेले असून, दुसऱ्या क्रमांकावर अकोल्यात बळींची संख्या नऊ आहे. त्यानंतर नागपूर सात, चंद्रपूर चार, भंडारा तीन, गडचिरोली तीन, नांदेड चार, जळगाव दोन, सोलापूर दोन, अमरावती दोन, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एक व्यक्ती मृत पावला आहे. 

Web Title: 1.70 crore help for who died in poisoning