नागपूर जिल्ह्यात १८ टक्के पाण्याचे नमुने दूषित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

ग्रामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्‍न असतानाच दूषित पाण्याच्याही तक्रारी येत आहे. एकीकडे पाणी नसताना दुसरीकडे दूषित पाणी असल्याने ग्रामीण जनतेच्या आरोग्यचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

नागपूर - ग्रामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्‍न असतानाच दूषित पाण्याच्याही तक्रारी येत आहे. एकीकडे पाणी नसताना दुसरीकडे दूषित पाणी असल्याने ग्रामीण जनतेच्या आरोग्यचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत घेतलेल्या पाण्याच्या ६१३ नमुन्यांपैकी १८ टक्के नमुने दूषित असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील तालुक्‍यांतील ६१३ गावांमधून पाण्याने नमुने घेण्यात आले. यातील १११ गावांचे नमुने दूषित असल्याचे तपासणीत समोर आले आहे. तसेच २७ जलस्रोतात क्‍लोरिनची मात्रा २० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. नागपूर ग्रामीण तालुक्‍यात सर्वाधिक पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. नरखेडमधील ३१ टक्के नमुने दूषित मिळाले. भिवापूर तालुक्‍यातील सर्व ६७ गावांमधील नमुने योग्य असल्याचे दिसून आले.

दूषित पाण्यामुळे आजार परण्याचा धोका निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दूषित जलस्रोतांवर लाल निशाण लावून वापरावर बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य समितीच्या बैठकीत उपाध्यक्ष व आरोग्य समितीचे सभापती शरद डोणेकर यांनी अधिकाऱ्यांना गावांमध्ये आवश्‍यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. 

नागपूर ग्रामीण तालुका
तालुका     नमुने     दूषित
मौदा     ३२       ३
कुही     ११९      ४
सावनेर    २३        १०
कळमेश्‍वर    २९        २
पारशिवनी    ४०        ४
उमरेड        ५८        ८
कामठी         १७         २
रामटेक        ४७      १३
हिंगणा       ४०       ७
काटोल       ६         ५
देवलापार      ७६        १६

Web Title: 18 percent water samples in Nagpur district are contaminated