18 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

18 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काल सोमवारी राज्यभरातील 18 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. या बदल्यांमध्ये नागपुरातील चार पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

नागपुरातील पोलिस प्रशिक्षण केंद्राचे पोलिस उपाधीक्षक रमेश भागवतराव तायवडे यांची बदली उपविभागीय पोलिस अधिकारी मूळ उपविभाग (जि. चंद्रपूर) येथे करण्यात आली. तर, जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे पोलिस उपअधीक्षक संतोषसिंह उत्तमसिंह बिसेन यांची बदली भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर करण्यात आली.

नागपूर ग्रामीण पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखेचे उपाधीक्षक राजेंद्र शंकरराव चव्हाण यांची बदली नागपूर उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर झाली. नागरी हक्‍क संरक्षण नागपूरचे पोलिस उपअधीक्षक सरदार नामदेव पाटील यांची बदली चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे उपविभागीय पोलिस उपअधीक्षकपदावर झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com