सूक्ष्म अनुदानाचे थकीत 185 कोटी मार्चपूर्वी देणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नागपूर - राज्यातील शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचन अनुदानाचे प्रलंबित 185 कोटी 22 लाख रुपये मार्च 2017 पूर्वी देण्यात येईल, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत केली. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना यापोटी भराव्या लागणाऱ्या कर्जरकमेवरील व्याजाबाबतही सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्‍वासन दिले. राज्यातील शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचनाचे अनुदान 2013 पासून थकीत असल्याचा प्रश्‍न सतीश चव्हाण, अमरसिंह पंडीत व धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री यांनी प्रलंबित अनुदान मार्चपर्यंत देणार असल्याचे सांगितले.

नागपूर - राज्यातील शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचन अनुदानाचे प्रलंबित 185 कोटी 22 लाख रुपये मार्च 2017 पूर्वी देण्यात येईल, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत केली. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना यापोटी भराव्या लागणाऱ्या कर्जरकमेवरील व्याजाबाबतही सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्‍वासन दिले. राज्यातील शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचनाचे अनुदान 2013 पासून थकीत असल्याचा प्रश्‍न सतीश चव्हाण, अमरसिंह पंडीत व धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री यांनी प्रलंबित अनुदान मार्चपर्यंत देणार असल्याचे सांगितले. सुरवातीला कृषी राज्यमंत्री यांनी पैशाच्या उपलब्धतेनुसार अनुदान दिले जाईल, असे सांगताच त्याला विरोधकांनी हरकत घेतली. निश्‍चित डेडलाइन जाहीर करा, अशी मागणी केल्यानंतर ही घोषणा केली. ठिबक अनुदानाचे 2011 पासून सुमारे 4 हजार 200 कोटी रुपये थकीत होते. त्यातील चार हजार कोटी दिले. 2013-14 या वर्षातले 128 कोटी तर आणि 2014-15 या वर्षातील 56 कोटी थकीत आहे. 2014-15 या वर्षात 349.27 कोटींची तरतूद केली. 2016-17 या वर्षात 408 कोटी रुपयांची तरतूद सूक्ष्म सिंचन अनुदानापोटी केली असल्याचे सांगितले.

Web Title: 185 crore will be performing micro Grant March