सात क्रमांकावरून फोन करून दाखविले नोकरीचे आमिष अन् घातला १९ लाखांचा गंडा; नटवरलाल गजाआड

19 lakh rupees fraud with youths in yavatmal
19 lakh rupees fraud with youths in yavatmal

यवतमाळ : आपला मुलगा आरोग्य विभागात मोठ्या पदावर असल्याचा बनाव करून सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवीत तब्बल 19 लाखांनी गंडा घातला. फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच नागरिकांनी थेट नटवरलालच्या घरी धडक देत त्याची धुलाई करून अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. 

रवींद्र उर्फ रघू गावंडे (वय 64, रा. देऊरवाडी, ता. आर्णी), सूरज रवींद्र गावंडे (वय 35, रा. अर्जुननगर, अमरावती) अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत. अमरावती जिल्ह्यातील आशीष बिडवाईक (वय 36, रा. अमरावती, ह.मु. यवतमाळ) या तरुणाच्या पत्नीला आरोग्यसेविका म्हणून नोकरी लावून देण्याचे आश्वासन रघू गावंडे याने दिले होते. नातेवाइकांच्या मार्फत आशीषची ओळख गावंडे याच्यासोबत झाली होती. यवतमाळ येथील बसस्थानकावर रोख दीड लाख रुपये दिले आणि उर्वरित रक्कम नियुक्ती आदेशानंतर देण्याचे ठरले होते. दोन डिसेंबर 2020 रोजी नियुक्ती आदेशही दिला. त्यानुसार 28 डिसेंबर रोजी नोकरीवर रुजू होण्याचे कळविले. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीमुळे आचारसंहिता असल्याचे कारण देत स्थगिती आल्याचे सांगितले. आपला मुलगा मंत्रालयात फिल्डींग लावून असल्याची थाप मारली. दरम्यानच्या कालावधीत गावंडे याने फोनवर प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा खोडवे यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली. तेव्हा नियुक्ती आदेश बनावट असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनीही सदर नियुक्ती आदेश बनावट असल्याचे स्पष्ट केले. ललिता उभाड, रेणुका शेळके, मयूर डवरे, सुधा वाघमारे आणि तक्रारदार आशीष बडवाईक यांची 19 लाखांनी फसवणूक केल्याचे समोर आले. पीडितांनी एकत्र येऊन गावंडे याचा शोध घेत त्याच्या गावी धडक दिली. घरी सापडलेल्या नटवरलाल याला अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. आशीष बडवाईक याने पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून गावंडे व त्याच्या मुलाविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  

सात सीम कार्ड -
आरोग्यसेवक, कनिष्ठ लिपिक, लेखापाल आदी पदांवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविणारा रघू गावंडे याच्याकडे सात सीम कार्ड आहेत. त्याने संपर्कासाठी हे क्रमांक नागरिकांना दिले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांनी सातही क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 

बनावट नोटा अन्‌ शिक्केही -
देऊरवाडी येथे नागरिकांनी छापा टाकला. त्यावेळी एका पिशवीत साहित्य भरून पळून जाण्याच्या प्रयत्नात रघू गावंडे होता. नागरिकांनी शिताफीने त्याला पकडले. पिशवीत पाचशे रुपयांच्या नऊ बनावट नोटा, दिव्यांग व्यक्तीचे ओळखपत्र, समाजकल्याण विभागाचे अर्ज यासह विविध कागदपत्रांची जंत्रीच हाती लागली. गावंडे याने आणखी बऱ्याच जणांची फसवणूक केल्याची चर्चा आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com