निलोत्पल नागपूरचे नवे पोलिस उपायुक्त

Harsh Poddar
Harsh Poddar

नागपूर : गृह मंत्रालयाने सोमवारी राज्यातील 89 पोलिस उपायुक्त आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील हर्ष पोद्दार, रंजनकुमार शर्मा आणि अमोघ गांवकर यांचा समावेश आहे. विदर्भातून सहा अधिकारी बाहेर गेले तर सहा अधिकाऱ्यांची बदली विदर्भात करण्यात आली.

नागपूर येथील परिमंडळ 5 चे पोलिस उपायुक्त हर्ष पोद्दार यांची बीडचे अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली. नागपूर लोहमार्गचे अधीक्षक अमोघ गांवकर यांची अकोल्याचे अधीक्षक म्हणून तर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अधीक्षक रंजनकुमार शर्मा पोलिस उपायुक्त म्हणून बृहन्मुंबई येथे बदली करण्यात आली.

अकोल्याचे अधीक्षक राकेश कलासागर यांची तांत्रिक सेवा गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे, एसआरपी गट 4 चे समादेशक प्रणय अशोक यांची बृहन्मुंबई येथे, गोंदियाच्या अधीक्षक विनिता साहू यांची नवी मुंबई, मालेगाव (नाशिक ग्रा.) चे अपर अधीक्षक निलोत्पल यांची नागपूर शहर येथे, अमरावती येथील गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) च्या निवा जैन यांची एसआरपी गट 1 पुणे, जळगावचे अपर अधीक्षक लोहित मतानी यांची एसआरपी गट 9 अमरावतीचे समादेशक म्हणून बदली करण्यात आली. अमरावती शहरचे उपायुक्त प्रदीप चव्हाण यांची पश्‍चिम रेल्वे मुंबई येथे बदली करण्यात आली.
याशिवाय परभणीचे अपर अधीक्षक विश्व पानसरे यांची नागपूर लोहमार्गचे अधीक्षक,ण गडचिरोलीचे अपर अधीक्षक पंडित कमलाकर यांची नंदुरबारचे अधीक्षक, पुणे शहरचे उपायुक्त मंगेश शिंदे यांची गोंदियाचे अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांची गडचिरोलीला, नुरूल हसन यांची अपर अधीक्षक म्हणून यवतमाळला, अतुल कुळकर्णी यांची अपर अधीक्षक म्हणून अकोला, वर्ध्याचे अपर अधीक्षक निखिल पिंगळे यांची गोंदियाला, बीडचे अधीक्षक जी. श्रीधर यांची एसआरपी गट 12 वडसा येथे बदली करण्यात आली. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले डॉ. संदीप पखाले यांची अपर अधीक्षक म्हणून बुलडाणा येथे, श्रीकृष्ण कोकाटे यांची एसआरपी गट 4 नागपूर, लोहमार्ग नागपूरचे अपर अधीक्षक दत्ता राठोड यांची नांदेडला, गोंदियाचे अपर अधीक्षक संदीप अटोळे यांची पीटीएस नानविज (दौंड) येथे प्राचार्य म्हणून, भंडाऱ्याच्या अपर अधीक्षक रश्‍मी नांदेडकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक खाते नागपूर येथे, बुलडाण्याचे अपर अधीक्षक संदीप डोईफोडे आणि यवतमाळचे अपर अधीक्षक अमरसिंग जाधव यांची फोर्स वन अर्बन काउंटर प्रशिक्षण संस्था मुंबई येथे, अमरावती येथील एसआरपी गट 9 चे समादेशक महेश चिमटे यांची मुख्य सुरक्षा अधिकारी विधानमंडळ सचिवालय मुंबई येथे, पुणे महामार्गचे उपअधीक्षक अनिकेत भारती यांची अपर अधीक्षक म्हणून भंडारा येथे, साताऱ्याच्या उपअधीक्षक रजिया बालेखान म्हैसाळे यांची सीआयडी नागपूर येथे अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली. पुणे शहरचे सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांना पदोन्नती देऊन त्यांची वर्धा येथे अपर अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली.
अखेर एसीबीला अधीक्षक मिळाले
गेल्या सहा महिन्यांपासून नागपूर विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पद रिक्‍त होते. पी. आर. पाटील यांच्यानंतर अमरावतीचे अधीक्षकांकडे तात्पुरता पदभार देण्यात आला होता. मात्र, दोन विभागाचे पदभार सांभाळणे कठीण जात असल्यामुळे नागपूर एसीबी सुस्त झाली होती. आता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधीक्षकपदी रश्‍मी नांदेडकर यांची नेमणूक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com