जेसीबीच्या धडेकत दोन युवकांचा मृत्यू 

dead
dead

नागपूर : चुकीच्या दिशेने भरधाव येत असलेल्या जेसीबीने ट्रिपल सीट जात असलेल्या दुचाकीला धडक दिली. या अपघात दुचाकीस्वार युवकासह दोघे ठार झाले तर तिसरा युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी रात्री नऊ वाजता कळमना हद्‌दीत झाला. पृथ्वीराज मनोहर जाधव (वय 21, रा. रघुजी नगर) आणि सुशांत नागदेवे (आदिवासी कॉलनी) असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत तर शुभम गुणवंतराव वाघ (वय 21, रा. आदिवासी कॉलनी) हा सध्या भवानी रूग्णालयात जीवनमृत्यूची संघर्ष करीत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत नागदेवे याने काही दिवसांपूर्वीच हॉर्नेट गाडी घेतली होती. सुशांत हा मित्र शुभम आणि पृथ्वीराज यांच्यासह रविवारी दुचाकीने रामटेकला गड बघायला गेला होता. रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तिघेही सुसाट नागपुरात येत होते. कळमना हद्‌दीत जबरलपूर रोड, शेंद्रे ढाब्याजवळ तिघेही सुसाट जात होते. दरम्यान समोरून जेसीबी रॉंग साईडने येत होती. भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी थेट जेसीबीवर आदळली. या अपघातात सुशांत आणि पृथ्वीराज यांच्या डोक्‍याला जबर मार लागला तर मागे बसलेला शुभम रोडवर फेकल्या गेला. सुशांत आणि पृथ्वीराजच्या डोक्‍याचा चेंदामेंदा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर रस्त्याच्या कडेला फेकला गेलेला शुभम थोडक्‍यात बचावला.

शुभमवर खासगी रूग्णालयात शर्थीचे उपचार सुरू आहेत. कळमना पोलिसांनी जेसीबीच्या चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com