दुचाकीच्या अपघातात 2 ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

उमरखेड : दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना बेलखेड बेलखेड फाट्याजवळ रात्री 9 च्या सुमारास घडली.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मध्ये चोख पोलिस बंदोबस्तात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना रात्री 9 च्या सुमारास बेलखेड फाट्याजवळ दुचाकीची समोरासमोर धडक झाली. दोन्ही दुचाकीवरील दोन जण यात ठार झाले.
अतुल सुखदेव पांचाळ (24, रा. पळशी ता. उमरखेड), समाधान कुंडलिक वानखेडे (17, रा. इंदिरानगर उमरखेड) अशी मृतक युवकांची नावे आहेत. इतर दोघे गंभीर जखमी झालेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 killed in bike accident