खामगाव मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांसाठी 20 कोटी मंजूर!

खामगाव मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांसाठी 20 कोटी मंजूर!

खामगाव: लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी वर्षभरात केलेल्या सतत पाठपुराव्यामुळे खामगाव मतदार संघातील 26 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत 26 गावांसाठी स्वतंत्र नवी पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली आहे. या 26 गावांसाठी सुमारे 20 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर झाला आहे.

मंजूर करण्यात आलेल्या गावांमध्ये तांदुळवाडी 1 कोटी 62 लाख, चिखली (बु.)  1 कोटी 89 लाख, धापटी 33 लाख, बेलुरा 42 लाख, खामगाव ग्रामीण 90 लाख, अंबिकापूर 40 लाख, जळका तेली 55 लाख, किन्ही महादेव 35 लाख, मांडका 70 लाख, जयपूर लांडे 47 लाख, ढोरपगाव 25 लाख, लांजुड 57 लाख, पिंप्राळा 89 लाख, ज्ञानगंगापूर 30 लाख, दधम 88 लाख, फत्तेपुर 82 लाख, पिंप्री देशमुख 1 कोटी 17 लाख, वाकुड 66 लाख, आवार 1 कोटी 54 लाख, विहिगाव 50 लाख, पिंप्री कोरडे 50 लाख, पिंप्री धनगर 30 लाख, वरखेड (बु.) 90 लाख, तींत्रव 86 लाख, नायदेवी 82 लाख व हिवरखेड साठी 1 कोटी 40 लाख  रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या योजनेसाठी सर्व प्रशासकीय बाबी डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारी महिन्यातच सर्व गावातील पाणीपुरवठा योजनेच्या कामांना सुरवात होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com