बेंबळा प्रकल्पाचे 20 दरवाजे उघडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

यवतमाळ : जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पातील जलसाठा 40 टक्यावर पोहोचला आहे. हवामान खात्याने दिलेला अतीवृष्टीची शक्यता लक्षात घेता आज (ता.12) बेंबळा प्रकल्पातील 20 दरवाजे 25 सेमी ने उघडून प्रती सेंकद 500घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शहराला पाणीपुरवठा करणारा निळोणा व चापडोह प्रकल्प कोरड्या पडल्याने शहरात मोठी टंचाई निर्माण झाली होती.

पावसाची संततधार सुरु असल्याने आज शहराला पाणीपुरवठा करणारा निळोणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून चापडोह प्रकल्पातही 45 टक्के साठा झाला आहे. त्यामुळे आज दिवसभर तिन्ही ठिकाणी शहरातील नागरिकांनी पावसात मनसोक्त पर्यटनाचा आनंद लुटला.

Web Title: 20 doors of the bebla dam were opened