एसटी बसमधून 20 लाखांची रक्कम जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

भद्रावती (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील माजरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वणी-वरोरा महामार्गावर एसटी बसमधून लावारिस असलेली 20 लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली.
विधानसभा निवडणूक घोषणेनंतर महामार्गावर नाकाबंदी करून पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली आहे. दरम्यान, माजरी ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी (ता.27) सायंकाळी वणी-काटोल एसटी बस (क्र.एमएच 40वाय 5894) मध्ये 20 लाख रुपयांची रक्कम आढळली.

पाटाळा पोलिस चौकीजवळील मार्गावर पोलिसांनी सापळा रचून बसच्या सीटखाली लावारिस असलेल्या 20 लाख रुपयांची रकमेची प्रवाशांकडून चौकशी केली. त्यानंतर ही लावारिस असलेली रक्कम जप्त करण्यात आली. या रकमेचा पंचनामा करून 20 लाख रुपये वरोरा राजकीय कोषात जमा केले. विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असावी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 lakh from ST bus seized