vidhan sabha 2019 मांसाहारासाठी 200, शाकाहारसाठी मोजा 100 रुपये

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

नागपूर  : मांसाहारी जेवण 200 तर शाकाहारी फक्त शंभर रुपयात. कदाचित विश्‍वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. जेवणाचा हा दर निवडणूक विभागाच्या दरबारी आहे.

नागपूर  : मांसाहारी जेवण 200 तर शाकाहारी फक्त शंभर रुपयात. कदाचित विश्‍वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. जेवणाचा हा दर निवडणूक विभागाच्या दरबारी आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 21 ऑक्‍टोबरला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील बारा विधानसभा क्षेत्रातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांना खर्चासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दरसूची तयार केली होती. निवडणुकीकरिता उमेदवारास खर्चाची मर्यादा जवळपास 28 लाख रुपये आहे. त्यावर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर निश्‍चिती करण्यात आली. यात उमेदवारांमार्फत वापरण्यात येणाऱ्या प्रचार व प्रसिद्धीच्या साहित्याचे दर ठरवण्यात आले आहेत. प्रचाराची यंत्रणा, हॉटेल व लॉजचे भाडे, इतर साहित्य, स्टेशनरी, नाश्‍ता व जेवण, वाहनांच्या वापरावर होणाऱ्या खर्चाचे निकष ठरवण्यात आले आहेत. एकवेळच्या शाकाहारी भोजनासाठी 100 रुपये तर मांसाहारी भोजनासाठी 200 रुपये प्रतिव्यक्ती इतके दर निश्‍चित केले आहेत. तसेच एका चहासाठी 7 रुपये, कॉफीसाठी 12 रुपये मोजावे लागतील. लस्सीसाठी 20 रुपये, कोल्ड ड्रिंक्‍ससाठी 20, स्नॅक्‍सकरिता 25 रुपये मोजावे लागतील. राजकीय पक्षाच्या प्रचार सभेत, रॅलीत किंवा "कॉर्नर मिटिंग'ला शेकडो, हजारो लोक उपस्थित राहतात. या सर्वांची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे उमेदवार प्रत्यक्षात किती लोक दर्शविता, हा खरा प्रश्‍न आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 for meat, Rs 100 for vegetarian