200 रुपये रोज मिळतात होऽऽ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

नागपूर : दरमहा मिळणारे सहा हजार रुपये विद्यावेतन तरी वेळेवर द्यावे या मागणीसाठी मेडिकलचे इन्टर्न्स अधिष्ठाता कार्यालयावर धडकले. मागील ऑगस्ट, सप्टेंबरपासून विद्यावेतन मिळाले नसल्याची व्यथा यांनी बोलून दाखवली. एक इंटर्न्स म्हणाला, आम्हाला केवळ 200 रुपये रोज मिळतो. आमच्यापेक्षा मजुरी करणारे तरी बरे... विद्यावेतन वाढले याच आशेवर कसेतरी महिन्याचा खर्च भागविणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

इतर राज्यांच्या तुलनेत फारच कमी विद्यावेतन मिळत असल्याच्या विरोधात राज्यातील आंतरवासिता डॉक्‍टर अर्थात इंटर्न्स वेळोवेळी संप पुकारतात. वैद्यकीय शिक्षणमंत्री आश्‍वासन देत या आंतरवासितांच्या तोंडाला पाने पुसतात. नुकतेच आचारसंहितेचे कारण सांगून विद्यावेतनात वाढ केली नाही. तीन महिन्यांपूर्वी "असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स' (अस्मी) तर्फे विद्यावेतन वाढविण्यासाठी कामबंद आंदोलन पुकारले होते. कॉंग्रेसच्या काळात वाढलेल्या विद्यावेतनावर गुजराण सुरू आहे. सात दिवसांच्या आंदोलनानंतर विद्यावेतन वाढविण्याची कबुली वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिली होती. मात्र, आता आचारसंहितेचे कारण सांगून अंमलबजावणीला ब्रेक लावला. 
मुख्यमंत्र्यांना दिले होते पत्र 
विद्यमान वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी 2015 साली शासनाने विद्यावेतन वाढवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. सलग पाठपुरवठा करूनही वाढ झाली नाही. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निवेदन दिले. 26 एप्रिल 2018 रोजी महाराष्ट्रातील इंटर्न्सनी आंदोलन केले. 2 मे रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांच्याशी चर्चा झाली. 15 दिवसात विषय निकाली काढण्याचे आश्‍वास दिले, परंतु ते हवेतच मुरले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 rupees daily