हुक्‍का पार्लर पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर

file photo
file photo

नागपूर : युवा पिढी हुक्‍का पार्लरकडे आकर्षित झाल्यानंतर हळूहळू अमली पदार्थांकडे वळली होती. नशेच्या आहारी जाणाऱ्या युवकांना रोखण्यासाठी शासनाने राज्यभरातील हुक्‍का पार्लर बंद केले. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने "हर्बल हुक्‍का' पार्लरला परवानगी दिली. त्यामुळे हर्बलच्या नावे राज्यात पुन्हा हुक्‍का पार्लर सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.
राज्यात जवळपास 10 हजारांपेक्षा जास्त हुक्‍का पार्लर सुरू होते. हुक्‍का पार्लरमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरच्या तंबाखूचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे युवा पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकली होती. जवळपास सर्वच हुक्‍का पार्लरमध्ये विदेशी मद्य आणि ड्रग्ज उपलब्ध करून देण्यात येत होते. नशेचा "चस्का' लागलेल्या तरुण-तरुणींची हुक्‍का पार्लरमध्ये गर्दी वाढली होती. अनेक तरुणी आणि शाळकरी मुलीसुद्धा दारू-ड्रग्ज-हुक्‍क्‍याच्या नशेसाठी देहविक्रयसारख्या अनैतिक मार्गाला लागल्या होत्या. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आयुष्य खराब होत असल्याचे हेरून शासनाने राज्यातील सरसकट हुक्‍का पार्लरवर बंदी घातली. तेव्हापासून राज्यातील हुक्‍का पार्लर बंद करण्यात आले. अनेक हुक्‍का पार्लरवर छापे घालून कारवाई केली होती.
................
हर्बल हुक्‍क्‍याला न्यायालयाची परवानगी
मुंबईतील "शिशा कॉईलॉंज' हॉटेलचे मालक अली रेजा अब्दी यांनी उच्च न्यायालयात "हर्बल हुक्‍का पार्लर'ला परवानगी देण्यासाठी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्या. रंजित मोरे यांनी हर्बल हुक्‍का पार्लरला परवानगी दिली. तंबाखूमुक्‍त हुक्‍का पार्लरवर कारवाई न करण्याचे संबंधित प्रशासनाला आदेश दिले आहेत.
...............
यंत्रणा अपुरी, कारवाई कशी?
उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन राज्यातून आता हर्बल हुक्‍का पार्लर चालविण्यासाठी परवानगीची मागणी होणार आहे. प्रत्येक शहरात जवळपास 100 ते 150 हुक्‍का पार्लर सुरू होणार आहेत. काही दिवसांतच "हर्बल'च्या नावे फ्लेवर तंबाखूचा हुक्‍का उपलब्ध करण्यात येण्याची शक्‍यता आहे. जरी तंबाखूजन्य पदार्थांच्या हुक्‍क्‍यावर कारवाई करण्याचे आदेश असले तरी राज्यभरात सक्षम यंत्रणा नसल्याने राज्यात पुन्हा हुक्‍का पार्लरचा सुळसुळाट होणार आहे.
............
अर्थपूर्ण व्यवहार वाढणार!
शहरात हुक्‍का पार्लर सुरू झाल्यास पोलिस-एफडीआय विभागाची चांदी होणार आहे. काही दिवस हर्बल हुक्‍का सुरू करून नंतर पोलिस आणि एफडीआय विभागाशी अर्थपूर्ण व्यवहार करून नियमित हुक्‍का पार्लर सुरू होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांतच युवा पिढीचा हर्बलच्या माध्यमातून ड्रग्ज, विदेशी मद्य आणि हुक्‍क्‍याचा शौक पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com