कोणी प्रवेश घेता का, प्रवेश?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या अकरावी प्रवेशासाठी 17 ऑक्‍टोबरपर्यंत देण्यात आलेल्या शेवटच्या संधीमध्ये 37 हजार 558 विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला. जवळपास 51.04 टक्के जागांवर प्रवेश दिले असून, 21 हजार 282 जागा रिक्त आहेत. 

नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या अकरावी प्रवेशासाठी 17 ऑक्‍टोबरपर्यंत देण्यात आलेल्या शेवटच्या संधीमध्ये 37 हजार 558 विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला. जवळपास 51.04 टक्के जागांवर प्रवेश दिले असून, 21 हजार 282 जागा रिक्त आहेत. 
शहरातील 58 हजार 240 जागांवर प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्या तीन फेरीत अकरावीच्या 22 हजार 501 जागा भरल्या होत्या. त्यानंतरही जवळपास 35 हजार 741 जागा रिक्त असल्याने नऊ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन केले होते. 14 ऑगस्टला विशेष फेरीची गुणवत्ता यादी प्रकाशित करून 16 ते 19 ऑगस्टपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले. यानंतर पुन्हा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देणाऱ्या सहा फेऱ्या घेण्यात आल्या. त्यात 29 हजार 169 प्रवेश देण्यात आले. यानंतर एक ऑक्‍टोबरला पुन्हा एक संधी देण्यात आली. त्यातही रिक्त जागांचे प्रमाण अधिक असल्याने 15 ते 17 ऑक्‍टोबरपर्यंत पुन्हा शेवटची संधी देण्यासाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार, 37 हजार 558 विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला. यात कला शाखेत दोन हजार 727, वाणिज्य शाखेत आठ हजार 112, विज्ञान शाखेत 17 हजार 442 तर एमसीव्हीसीत एक हजार 768 जागांवर प्रवेश देण्यात आले. मात्र, 49 टक्के जागा रिक्‍त असून, त्याची संख्या 21 हजार 282 एवढी आहे. 

एकूण जागा - 58,840 
केंद्रीय समितीमार्फत प्रवेश - 30,009 
आरक्षित जागांचे प्रवेश - 7,529 
एकूण प्रवेश - 37,558 
रिक्त जागा - 21,282 
प्रवेशाची टक्केवारी - 51.04 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 21 thousand 282 seats vacant

टॅग्स