पालक गमावलेल्या चिमुकल्यांच्या निःशब्द वेदना

पालक गमावलेल्या चिमुकल्यांच्या निःशब्द वेदना

यवतमाळ : कोरोना (coronavirus) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचे अक्राळविक्राळ रूप समोर आले. सर्वकाही ‘वेदना’ या शब्दांच्या पलीकडचे आहे. कुणी मुले चालायला, रांगायला, बोलायला लागलीत. सुखी संसाराची स्वप्न रंगवत असतानाच कोरोनाने अनेक कुटुंबांना मरणप्राय वेदना दिल्या. जिल्ह्यात तब्बल २१७ बालकांनी पालकांना गमावले (217 children lost their parents) आहे. महिला व बालकल्याण समितीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. (217-children-lost-their-parents-in-Yavatmal-district)

जिल्ह्यात आतापर्यंत कोविडमुळे पालक गमावलेल्या २१७ मुलांचा शोध घेण्यात आला आहे. त्यात १६२ मुलांनी वडील गमावले असून, ५१ मुलांनी आई गमावली आहे, तर चार मुलांनी आई व वडील या दोघांनाही गमावले आहे. कोविडमुळे ज्या बालकांनी आपले एक किंवा दोन्ही पालक गमावले आहेत, अशा बालकांना शासनातर्फे बालसंगोपन योजनेअंतर्गत प्रतिमहा रुपये १,१०० मदत देण्यात येते.

पालक गमावलेल्या चिमुकल्यांच्या निःशब्द वेदना
धोका वाढला! 'मेडिकल'च्या कोविड वॉर्डात दहा मुले भरती

ज्यांना मदतीची गरज आहे किंवा जे कुटुंब बालकल्याण समितीपर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा गरजवंत पात्र कुटुंबीयांपर्यंत समितीने प्रत्यक्ष पोहोचावे व त्यांना मदत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासनाला दिले. दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा काळ सर्वाधिक परीक्षा पाहणारा ठरला. ज्यांना आई-बाबा म्हणजे काय, हे कळायला लागले असतानाच काळाने घाला घातला. दोनशेपेक्षा जास्त बालकांना न कळत्या वयात मायेला पोरके व्हावे लागले.

दीड महिन्यात समाजमाध्यमांवर अशा बालकांना दत्तक द्यायचे आहे, असा मॅसेज व्हायरला झाला होता. त्यातून फसवणूक व बालकांची तस्करी होण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने निराधार झालेल्या बालकांचा शोध घेऊन मदतीचा हात पुढे केला. इवल्याशा जिवांचे आभाळच फाटल्याने कुठे कुठे ठिगळ लावणार, अशी समस्या आहे. मात्र, प्रशासन व शासन पालकांच्या भूमिकेत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

पालक गमावलेल्या चिमुकल्यांच्या निःशब्द वेदना
वाढदिवसापूर्वीच 'ती' निघून गेली, आईने फोडला टाहो

गृहभेटीद्वारे सर्वेक्षण

मार्च २०२० पासून आलेल्या कोरोनामुळे जिल्ह्यातील काही कुटुंबांमधील कर्त्याव्यक्तीचे निधन झाले आहे. काही कुटुंबात आई व वडील दोघांचेही निधन झाले आहे. तर काही कुटुंबांत मुलाचे निधन झाल्याने त्यांना आधाराची गरज आहे. अनेकांना मदतीसाठी अर्ज कसे करावेत, याबाबतचीदेखील माहिती नाही. निराधार झालेल्या कुटुंबांना भेटी देऊन त्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

(217-children-lost-their-parents-in-Yavatmal-district)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com