22 लाखांची रोकड जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

नागपूर : शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी रात्री 22 लाखांची रोकड एका कारमधून जप्त केली. ही रक्कम आयकर विभागाकडे सुपुर्द करण्यात आली आहे.

नागपूर : शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी रात्री 22 लाखांची रोकड एका कारमधून जप्त केली. ही रक्कम आयकर विभागाकडे सुपुर्द करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुकडोजी पुतळा चौकात एक पार्क केलेली असून त्यामध्ये मोठी रक्कम असल्याचे खबऱ्याने सांगितले. तत्काळ पोलिसांनी तेथे पोहोचून कारची झडती घेतली असता 22 लाखांची रोख रक्कम सापडली. ही रक्कम अजनी पोलिस ठाण्यात आणून आयकर विभागाकडे पुढील कारवाईसाठी देण्यात आली. अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक माने, स.पोलिस निरीक्षक चौगुले आदींचा या कारवाईत सहभाग होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 lakh seized from car