वर्षभरात 22 वाघ गमावले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात दोन वाघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याने वन्यजीव संरक्षणाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारला पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असताना गेल्या एका वर्षात 22 वाघांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशाने वर्षभरात 26 वाघ गमावले आहेत. देशात पहिला क्रमांक तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात 95 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीत 22 वाघांचा मृत्यू झाला. त्यातील तीन वाघांचे बछडे गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये जन्मतः मरण पावले होते. ते तिन्ही वाघ रेस्क्‍यू सेंटरमधील असल्याने वन विभागाकडे त्याची नोंद नसली तरी वाघांची मरण्याची संख्या 22 वर गेली आहे. गेल्यावर्षी एवढाच आकडा यंदाही गाठला आहे. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या शेजारी विष प्रयोग करून दोन वाघांचा मृत्यू होणारे ही बाब चिंता वाढविणारी आहे. यावरून वन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हेच कारणीभूत असल्याचे यावरून दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक नऊ, नागपूर जिल्ह्यात सात, भंडारा व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी दोन, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एका वाघाचा मृत्यू झाला आहे. 23 जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विभागात नैसर्गिकरित्या पहिला वाघ मरण पावला होता. टी वन (अवनी) या वाघिणीची शिकार करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात 26, महाराष्ट्र 22 आणि त्यापाठोपाठ कर्नाटकमध्ये 12 वाघ मरण पावले आहेत. देशभरात आतापर्यंत एकूण 94 वाघ मरण पावले असल्याची माहिती पुढे आली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मनुष्य हानीत विक्रमी घट झालेली आहे. हे वन विभागासाठी सुखद धक्का देणारी बाब आहे.

Web Title: 22 tigers lost in the year