यंदा झेडपीच्या अडीचशे शाळा होणार डिजिटल

Digital-School
Digital-School

नागपूर - सीएसआर फंडातून मिळणाऱ्या दहा कोटींच्या निधीतून यंदा जिल्हा परिषदेच्या अडीचशे शाळा डिजिटल करण्यात येणार आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यात ही भर पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असल्याने डिजिटल ग्रामपंचायतीचा मानही नागपूर जिल्ह्याला मिळाला आहे. आता राज्य सरकारच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील शाळांनी डिजिटल शिक्षणाची कास धरली आहे. नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत एक हजार ५३९ शाळा आहेत. त्यापैकी ७५० शाळांमध्ये डिजिटल क्‍लासरूम सुरू झाल्या आहेत. त्या ठिकाणी एलसीडी प्रोजेक्‍टर, कॉम्प्युटर आणि टॅब  मोबाइलद्वारे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कार्यक्रम निर्धारित करण्यात आला. यामध्ये एकही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही, याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकावर निश्‍चित करण्यात आली. अप्रगत विद्यार्थ्यांची प्रगती करण्यासाठी कृतिशील अध्ययन पद्धतीचा वापर करून शिक्षकांनी स्वेच्छेने उपक्रम राबवून अप्रगत विद्यार्थीही शाळा तयार करण्याच्या सूचना शिक्षण खात्याकडून यापूर्वीच करण्यात आल्या होत्या. डिजिटल क्‍लासरूममध्ये एलसीडी प्रोजेक्‍टर, कॉम्प्युटर आणि टॅब मोबाईलच्या साहाय्याने शिक्षणाचे धडे दिले जात आहे. मात्र, यानंतरही जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या ही दरवर्षी घटत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com