अमरावती जिल्ह्यात 2607 मतदान केंद्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

अमरावती : अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर, मोर्शी आणि धामणगांवरेल्वे या आठ मतदारसंघातील 2 हजार 607 मतदान केंद्रावरून 21 ऑक्‍टोबरला मतदान प्रक्रिया पार पडेल. 24 ऑक्‍टोबरला अमरावती व बडनेरा मतदारसंघाची मतमोजणी विलासनगरातील गोदामात केली जाईल. तर उर्वरित सहा विधानसभेची मतमोजणी मतदारसंघनिहाय केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी (ता. 21) पत्रपरिषदेत दिली. जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेची पूर्ण तयारी झाल्याचे त्यांनी सांगितले.

अमरावती : अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर, मोर्शी आणि धामणगांवरेल्वे या आठ मतदारसंघातील 2 हजार 607 मतदान केंद्रावरून 21 ऑक्‍टोबरला मतदान प्रक्रिया पार पडेल. 24 ऑक्‍टोबरला अमरावती व बडनेरा मतदारसंघाची मतमोजणी विलासनगरातील गोदामात केली जाईल. तर उर्वरित सहा विधानसभेची मतमोजणी मतदारसंघनिहाय केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी (ता. 21) पत्रपरिषदेत दिली. जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेची पूर्ण तयारी झाल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीसाठी 5 हजार 67 बॅलेट युनिट, 3 हजार 726 कंट्रोल युनिट, तर 3 हजार 790 व्हीव्हीपॅट मशीन तयार असून त्याची प्राथमिक चौकशीदेखील पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यंदाही जिल्ह्यात आदर्श मतदान केंद्र, विशेष महिला मतदान केंद्र, दिव्यांग मतदान केंद्र व सर्वच मतदान केंद्रावर सेवा-सुविधा पूरविल्या जातील. जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेची माहिती देताना नवाल म्हणाले की, 2 हजार 607 मतदान केंद्र नियुक्त करण्यात आले आहे. धामणगावरेल्वेत सर्वाधिक 372, मेळघाटात 353, दर्यापुरात 337, बडनेरात 326, तिवसात 319, मोर्शीत 309, अचलपुरात 300 आणि अमरावतीत सर्वाधिक कमी 291 मतदान केंद्र राहतील. आठही विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांना 24 लाख 45 हजार 766 मतदार आपला हक्क बजावतील. यामध्ये पुरुषांची संख्या 12 लाख 58 हजार 99, महिला वोटर 11 लाख 87 हजार 625 व अन्य 42 मतदारांची संख्या आहे. 27 सप्टेंबरला निवडणुकीची अधिसूचना प्रसारित होईल. 4 ऑक्‍टोबरपर्यंत नामनिर्देश अर्ज दाखल करावे लागेल. 5 तारखेला पडताळणी करून 7 ऑक्‍टोबरला निवडणुकीचा बिगूल वाजेल. 21 ऑक्‍टोबरला मतदान तर 24 ला मतमोजणी होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2607 polling stations in Amravati district