ऐतिहासिक मस्कऱ्या गणेशोत्सवाचे 264 वे वर्ष

file photo
file photo

नागपूर : श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले ऊर्फ चिमणाबापू यांनी 1755 मध्ये नागपुरात मस्कऱ्या (हडकपक्‍या) गणेश उत्सवाची सुरुवात केली. ही परंपरा आजतागायत सुरू आहे. यंदाही मंगळवार (ता. 17) पासून उत्सवाला प्रारंभ होत असला तरी सोमवारी गणरायांचे वाजतगाजत आगमन होणार आहे. या ऐतिहासिक गणेशोत्सवाचे यंदा 264 वे वर्ष आहे.
महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टतर्फे 17 ते 27 सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राजे खंडोजी महाराज भोसले 1755 मध्ये बंगालच्या स्वारीवर गेले होते. विजयी होऊन परतेपर्यंत कुळाचारी गणेशोत्सवाचे विसर्जन झाले होते. बंगाल विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मस्कऱ्या गणपतीची सार्वजनिक स्वरूपात स्थापना केली होती. त्यात नकला, लावणी, खडीगंमत असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी गणपतीची 12 हातांची 21 फूट उंच मूर्ती स्थापन केली जायची. यंदा तशीच 12 हातांची 7 फुटांची गणेशमूर्ती स्थापित केली जाणार आहे.
सोमवारी (ता. 16) गणरायांचे आगमन होणार आहे. दुपारी साडेतीनला गांधी पुतळा येथून मिरवणूक निघेल व बडकस चौक, केळीबाग रोड, नरसिंग टॉकीज चौकमार्गे सिनियर भोसला पॅलेस येथे येईल. मंगळवारी श्रीमंत राणी वासंतिकाराजे आणि राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते दुपारी साडेतीनला गणरायाची स्थापना होईल.
बुधवारी सायंकाळी साडेसहाला हास्यकल्लोळ (लाफ्टर शो) कार्यक्रम होणर असून त्यात मनोज सामदेकर, अजिंक्‍य बागडे यांचा समावेश असेल. गुरुवारी जय मॉं वैष्णो जागरण, शुक्रवारी विविध संस्कृतीवर आधारित लोकनृत्य, शनिवारी आनंद मेळावा व नृत्यस्पर्धा, रविवारी दुपारी तीनला महिलांसाठी विविध खेळ व सायंकाळी साडेसहाला संगीतमय कार्यक्रम होईल. सोमवारी रजनी नागपूरकर यांची लावणी, मंगळवारी दुपारी रोगनिदान शिबिर त्यानंतर महाप्रसाद होईल. 25 सप्टेंबरला शिवशाहीर संतोष साळुंके पोवाड्याचा कार्यक्रम सादर करतील. 26 ला हाऊजी गेम तर 27 सप्टेंबरला दुपारी साडेतीनला विसर्जन मिरवणूक निघेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com