
एक हजार ६३१ स्रोतांतील पाणी पिण्यायोग्य आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनफिट असलेल्या स्रोतांवर उपाययोजना करण्याची मोठी कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.
यवतमाळ : जिल्ह्यात मॉन्सूननंतर पाण्याच्या स्रोतांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत एक हजार ९१० स्रोतांपैकी २७९ स्रोत पिण्यास अयोग्य आढळून आले. एक हजार ६३१ स्रोतांतील पाणी पिण्यायोग्य आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनफिट असलेल्या स्रोतांवर उपाययोजना करण्याची मोठी कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.
हेही वाचा - चक्क १५० किलो सोन्या-चांदीच्या कमानीने केले होते आमदाराचे स्वागत, प्रचंड गर्दीत एकही...
जिल्ह्यात पाच हजार ७८५ पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत. या स्रोतांतील पाण्याची दरवर्षी मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूननंतर तपासणी केली जाते. यात फ्लोराईड, नायट्रेटसह इतरही खनिजजन्य पदार्थ आढळून आल्यास संबंधित स्रोत अयोग्य असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले जाते. त्या अनुषंगाने प्रशासनाने मॉन्सूनपूर्व पाणी नमुने मार्च ते मे २०२० दरम्यान घेतले. यात सहा हजार ६४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये पाच हजार ७७१ नमुन्यांचे पाणी पिण्यायोग्य आढळून आले होते. तब्बल ८७६ पाण्याचे स्रोत पिण्यासाठी अयोग्य होते. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती.
हेही वाचा - येणाऱ्या बाळासाठी केलेला नवस पूर्ण करण्यासाठी गेला बाप; मात्र, बाळ येण्यापूर्वी...
पावसाळ्यात संसर्गजन्य आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात राहते. परिणामी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्घतीने होणे अपेक्षित आहे. परंतु, मोठ्या प्रमाणात पाण्याचे स्रोत दूषित आढळून आल्याने प्रशासनासमोर समस्यांचा डोंगर उभा आहे. पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून मॉन्सूननंतर पाणी नमुने तपासणीस सुरुवात करण्यात आली. प्रत्येक दिवशी संबंधित गावात जाऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे सादर करण्यात येते. आतापर्यंत पाच हजार ७८५ नमुने प्रयोगशाळेकडे प्राप्त झाले आहेत. प्रयोगशाळेने एक हजार ९१० पाण्याच्या स्रोतांची तपासणी केली. त्यात २७९ पाण्याचे स्रोत पिण्यास अयोग्य असल्याचा निर्वाळा देण्यात आला. या प्रकारामुळे संबंधित गावातील नागरिकांसमोर पुन्हा पिण्याच्या पाण्याचे टेन्शन वाढले आहे. संबंधित स्रोत पिण्यायोग्य करण्याच्या दृष्टीने प्रशासनाला पावले उचलावे लागणार आहेत. अन्यथा, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - खासदार नवनीत राणा संतापल्या: 'त्या' ठाणेदार आणि बीट जमदारावर गुन्हे दाखल करण्याची पोलिस...
अनफिट आलेले तालुक्यानुसार स्रोत -
हेही वाचा - हुंडाबळी! सासऱ्याने सुनेला चौथ्या माळ्यवरून ढकलले;...
फ्लोराईड, नाईट्रेटचे प्रमाण अधिक -
जिल्ह्यात दहा हजारांवर पाण्याचे स्रोत आहेत. असे असले तरी सहाशेहून अधिक पाण्याचे स्रोत फ्लोराईडयुक्त तर दोनशेहून अधिक स्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे.